---Advertisement---

PSL मध्ये अर्धशतकाने वॉर्नरचा जलवा; केली दिग्गजांच्या यादीत एन्ट्री

On: मंगळवार, एप्रिल 22, 2025 8:39 AM
---Advertisement---

सध्या भारतात आयपीएलचा उत्साह दिसून येत असताना, पाकिस्तान सुपर लीग 2025 ची मालिका पाकिस्तानमध्ये सुरू आहे. लीगच्या 11 व्या सामन्यात कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी हे संघ आमनेसामने होते. आतापर्यंत पीएसएलमध्ये एकतर्फी सामने पाहायला मिळत होते. पण कराची आणि पेशावरमध्ये कठीण स्पर्धा दिसून आली. या सामन्यात कराची किंग्जचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मोठी कामगिरी केली. पेशावर झल्मी विरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले.

बाबर आझमच्या पेशावर झल्मी संघाविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने 47 चेंडूत 60 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने त्याच्या टी-20 कारकिर्दीत 13000 धावाही पूर्ण केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज आहे. अलीकडेच, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने 13000 टी-20 धावा पूर्ण केल्या. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

गेलने 463 सामन्यांमध्ये 14552 धावा केल्या आहेत. वॉर्नर व्यतिरिक्त इंग्लंडचा अ‍ॅलेक्स हेल्स, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड यांनीही 13000 धावा केल्या आहेत. आता डेव्हिड वॉर्नरनेही या 13000 क्लबमध्ये प्रवेश केला आहे. हा पराक्रम करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. वॉर्नरने आता 404 टी-20 सामन्यांमध्ये 13019 धावा केल्या आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना पेशावर झल्मीने 20 षटकांत 8 गडी गमावून 147 धावा केल्या. सलामीला आलेल्या बाबरने 41चेंडूत 46 धावांची संथ खेळी खेळली. या सामन्यात संघाचे मधल्या फळीचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. शेवटी, अल्झारी जोसेफने 13 चेंडूत नाबाद 24 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. कराची किंग्जकडून अब्बास आफ्रिदी आणि खुशदिल शाह यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना कराची किंग्जची सुरुवातही खराब झाली. पहिल्याच चेंडूवर टिम सेफर्ट ल्यूक वूडचा बळी ठरला. या सामन्यात जेम्स विन्सची बॅटही चालली नाही. दोन विकेट लवकर पडल्यानंतर, कर्णधार वॉर्नरने जबाबदारी स्वीकारली. या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली आणि 60 धावा करून बाद झाला. त्याच्याशिवाय खुसदिल शाह 17 चेंडूत 23 धावा करत नाबाद राहिला. या रोमांचक सामन्यात कराची किंग्जने शेवटच्या षटकात विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---