---Advertisement---

फाफ डू प्लेसिस म्हणतोय, ‘या’बाबतीत आयपीएलपेक्षा सरस आहे पीएसएल

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वोत्तम टी २० लीग मानली जाते. गेल्या काही वर्षांत बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल), पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) आणि बिग बॅश लीग (बीबीएल) सारख्या वेगवेगळ्या क्रिकेट लीगला सुरुवात झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आयपीएलचा वेगळाच प्रभाव आहे. याच कारणास्तव जगभरातील क्रिकेटपटू आयपीएलला फ्रेंचायझी क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा म्हणतात. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसलाही असेच वाटते. परंतु, एका बाबतीत तो पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएलला आयपीएलपेक्षा चांगला मानतो.

याबाबतीत पीएसएल सरस
डू प्लेसिस आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो तर, पीएसएलमध्ये तो क्वेटा ग्लेडिएटर्सशी संबंधित आहे. पीएसएलमध्ये वेगवान गोलंदाजीचा तर, आयपीएलमध्ये फिरकी गोलंदाजीचा स्तर मोठा आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने पाकिस्तान क्रिकेटशी संवाद साधताना म्हटले की, “पीएसएलमधील खेळाची पातळी चांगली आहे. या स्पर्धेबद्दल सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे येथे असणारे वेगवान गोलंदाज. मी दक्षिण आफ्रिकासारख्या देशातून येतो. मात्र, मला आश्चर्य वाटते की इथले बहुतेक गोलंदाज १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतात. पीएसएलची खरी ताकद हीच आहे.”

भारतातील फिरकीपटूमध्ये विविधता
आयपीएलविषयी बोलताना डू प्लेसिस म्हणाला की, “भारतात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागतो. आयपीएलमध्ये दर्जेदार फिरकीपटू तुम्हाला पाहायला मिळतील.”

डू प्लेसिस देखील आयपीएल २०२१ चा एक भाग होता. मात्र, कोरोनामुळे स्पर्धेला २९ सामन्यांनंतरच स्थगित करावे लागले. डू प्लेसिस २०१४ पासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याने आत्तापर्यंत सात सामन्यात ३७९ धावा केल्या असून यात सलग चार अर्धशतके समाविष्ट आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

संघसहकारी असावे तर असे! न्यूझीलंड विरुद्ध ४७७ मिनिटे फलंदाजी करत शतक करणाऱ्या बर्न्सचे ड्रेसिंगरुममध्ये खास स्वागत

हार्दिकचा ‘भाई’ लूक बघून बुमराह झाला रिऍक्ट; म्हणाला, ‘हा ईगल गँगचा मेंबर’

मन जिंकलंस लेका! अवघ्या ९ वर्षीय मुलाची प्रतिभा पाहून दिग्गज स्टीव्ह वॉ देखील दंग; मानले आभार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---