सध्या भारतातील सर्वच क्रीडाविश्वात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. मागील महिन्यातच जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यानंतर आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवडणूक होईल. रविवारी (27 नोव्हेंबर) या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख होती. या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी केवळ भारताची माजी धावपटू पी टी उषा हिचा अर्ज आला. त्यामुळे आता तीच भारतीय ऑलिम्पिक संघटनेची नवी अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पदांसाठी माजी क्रिकेटपटू उत्सुक असल्याचे दिसले. 10 डिसेंबर रोजी ही निवडणूक पार पडेल. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी केवळ माजी धावपटू व राज्यसभा खासदार पी टी उषा यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्याच पुढील अध्यक्ष होऊ शकतात. यासह या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील.
पायोली एक्सप्रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उषा या भारतातील सर्वात वेगवान महिला धावपटू ठरल्या होत्या. 1984 लॉस एंजेलिस ऑलिंपिक मध्ये त्यांचे ऑलिम्पिक पदक सेकंदाच्या दहाव्या भागाने हुकले होते. निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक युवा धावपटू घडवले आहेत. संघटनेतील इतर पदांसाठी 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणारे नेमबाज गगनार व कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी देखील अर्ज दाखल केला आहे.
संघटनेमध्ये एक अध्यक्ष, एक वरिष्ठ उपाध्यक्ष, दोन उपाध्यक्ष (एक पुरुष आणि एक महिला), एक कोषाध्यक्ष, दोन संयुक्त सचिव (एक पुरुष आणि एक महिला), सहा इतर कार्यकारी परिषद सदस्यांसाठी निवडणूक होईल.
(PT Usha Set To Elected As IOA Chief)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या माजी दिग्गजाने पुन्हा साधला भारतावर निशाणा, धवन- लक्ष्मणच्या निर्णयावर म्हणाला…
‘या’ 2 कारणांमुळे संजू सॅमसन सारखाच होतोय टीम इंडियातून बाहेर? वसीम जाफरचा संघ व्यवस्थापनावर निशाणा