अॅडलेड। भारताची आॅस्ट्रलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका आजपासून (6 डिसेंबर) सुरु झाली आहे. हा सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर 87.5 षटकात 9 बाद 250 धावा केल्या. भारताकडून चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारताच्या फलंदाजीची सुरुवात अंत्यत खराब झाली आहे. भारताने केएल राहुल, मुरली विजय, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी 50 धावांच्या आतच विकेट गमावल्या होत्या.
त्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 41 अशी असताना पुजाराने भारताचा डाव सावरला आहे. त्याने हा डाव सावरताना त्याचे 16 वे कसोटी शतकही पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा त्याने 108 डावांमध्ये पूर्ण केला आहे.
विशेष म्हणजे द वॉल अशी ओळख असणारा राहुल द्रविडनेही 5000 कसोटी धावा या 108 डावांमध्येच पूर्ण केल्या होत्या. तसेच द्रविड आणि पुजारा यांनी 3000 आणि 4000 कसोटी धावाही सारख्याच डावांमध्ये पूर्ण केल्या आहेत. त्यांनी त्यांचे 3000 कसोटी धावा 67 डावांमध्ये तर 4000 कसोटी धावा 84 डावांमध्ये पूर्ण केल्या होत्या.
पुजाराने या सामन्यात 246 चेंडूत 123 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 7 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–तीन धावांवर बाद होऊनही कर्णधार कोहलीने केला हा खास पराक्रम
–कसोटीत या गोलंदाजाने रोहित शर्माची घेतली आहे सर्वाधिक वेळा विकेट
–धोनीमुळे मी निवृत्ती घेतलेली नाही- व्हिव्हिएस लक्ष्मण
–Video: उस्मान ख्वाजाने घेतला किंग कोहलीचा अप्रतिम झेल