चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांसारख्या दिग्गजांची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आल्याचे संकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी दिले. कारण युवा खेळाडूंना अधिक संधी देण्यावर भर दिला जात आहे. विराट कोहली याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुजारा किंवा रहाणेला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती पण अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समिती मागे वळून पाहण्याच्या मनस्थितीत नाही. कोहलीच्या जागी रजत पाटीदारला संधी देण्यात आली.
पहिल्या कसोटीपूर्वी या निर्णयाबाबत रोहित म्हणाला, ‘आम्ही वरिष्ठ खेळाडूंना आणण्याबाबत बोललो होतो. नंतर विचार केला मग युवा खेळाडूंना संधी कधी मिळणार. आम्ही याचाही विचार केला.” तथापि, सीनियर खेळाडूंना बाहेर ठेवण्याचा निर्णय सोपा नव्हता. रहाणे शेवटचा भारताकडून २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला होता तर पुजारा २०२३ मध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.गेल्या वर्षीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर या दोघांना वगळण्यात आले होते.
रोहित म्हणाला, “सीनियर खेळाडूंना वगळण्याचा निर्णय सोपा नाही. त्यांनी इतक्या धावा केल्या आहेत, इतके सामने जिंकले आहेत आणि इतका अनुभव आहे की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. पण कधी-कधी नवीन खेळाडूंना संधी द्यावी लागते. त्यांना अनुकूल परिस्थितीत संधी दिल्यानंतरच त्यांना परदेशी भूमीवर मैदानात उतरवलं पाहिजे. तरुणांना संधी देणं मला महत्त्वाचं वाटतं.”
रजत पाटीदारने अहमदाबाद येथे इंग्लंड लायन्स विरुद्धच्या अनधिकृत कसोटीत भारत अ साठी 151 धावा केल्या आणि दोन दिवसीय सराव सामन्यात 111 धावा केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने खूप धावा केल्या आहेत. रोहित म्हणाला, “कोणासाठीही दरवाजे बंद नाहीत. तंदुरुस्त राहून धावा केल्या तर कोणालाही संधी मिळू शकते. अनुभवी खेळाडूंचे वयही संघ व्यवस्थापनाच्या मनात असेल हे नक्की. रोहित (३६), कोहली (३५), आर. अश्विन (३७) आणि रवींद्र जडेजा (३५) कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. (Pujara-Rahane’s career is over? Rohit Sharma This decision sparks discussion)
हेही वाचा
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धही शुबमन गिलचा ‘फ्लॉप शो’, टीम इंडिया आणखी किती संधी देणार?
लग्नानंतर तीन दिवसांत शोएब मलिकचे मोठे कांड, आता करियर संपल्यात जमा