India vs England 1st Test: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिल याला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र असे असतानाही भारतीय संघ त्याला सातत्याने संधी देत आहे. शुबमन २०२३ च्या वर्ल्ड कपपासून फ्लॉप ठरत आहे. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध त्यांना विशेष काही करता आले नाही. यानंतर हैदराबादमध्येही इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या 23 धावा केल्या. गिलच्या कामगिरीमुळे टीम इंडियाचा तणाव वाढू शकतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यादरम्यान शुक्रवारी (२६ जानेवारी) दुसऱ्या दिवशी 23 धावा करून तो बाद झाला. गिलने 66 चेंडूंचा सामना करत 2 चौकार मारले. पहिल्या दिवशी तो नाबाद राहिला होता. पण दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात तो बाद झाला.
शुबमन २०२३ च्या वर्ल्ड कपपासून फ्लॉप ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. यानंतर जोहान्सबर्गमध्ये तो 8 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतही तो फ्लॉप ठरला होता. सेंच्युरियनमध्ये गिल 2 आणि 26 धावा करून बाद झाला. यानंतर केपटाऊनमध्ये 36 धावा आणि 10 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध मोहाली टी-20 सामन्यात 23 धावा करून तो बाद झाला.
शुबमनने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 6 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत 10 डावात 163 धावा केल्या आहेत. त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे. गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 कसोटी सामनेही खेळले आहेत. या कालावधीत 11 डावात 444 धावा केल्या आहेत. त्याने बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 157 धावा केल्या आहेत. गिलने बांगलादेशविरुद्ध कसोटी शतक झळकावले आहे. एकूण बघितले तर त्याने २१ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 1063 धावा केल्या आहेत. (Shubman Gill’s ‘flop show’ against England, how many more chances will Team India give?)
हेही वाचा
लग्नानंतर तीन दिवसांत शोएब मलिकचे मोठे कांड, आता करियर संपल्यात जमा
क्रिकेटनंतर आता युवराज सिंग व्यावसायिक खेळाडूंकडून विशेष प्रशिक्षण घेऊन ‘या’ खेळात नशीब आजमवणार