महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच, सिन्नर संस्था सौजन्या ने ६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धाला काल (३१ ऑक्टोबर) पासून सिन्नर येथे सुरुवात झाली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुष विभागात १२ सामने तर महिला विभागात ६ सामने खेळवण्यात आले. महिला विभागात झालेल्या उद्घाटनच्या सामन्यात यजमान नाशिक संघाने ५३-३० असा सहज परभणीचा पराभव केला. चढाईत ज्योती पवारने चांगला खेळ केला. पालघर महिला लातूरचा ६६-०८ असा धुव्वा उडवला.
पुरुषाच्या उद्घाटन सामन्यात रत्नागिरीने यजमान नाशिकचा ४९-२८ असा पराभव केला. गतविजेते पुणेने लातूर ला ४५-१५ असे सहज नमवले. पुणेच्या रोहित पष्टे व सागर काळे चांगला खेळ दाखवला. पालघरने कोल्हापूर संघाला चांगली लढत दिली.
महिलांमध्ये रायगड संघाने जळगाव वर ६७-२३ असा विजय मिळवला. रायगड कडून चढाईत अनिता भोईर तर पकडीत मोनाली घोंगे यांनी चांगला खेळ केला. तर पुणेच्या महिला संघाने उस्मानाबाद संघाला तब्बल ७१ गुणांच्या फरकाने पराभूत केले. गतविजेते महिला संघ मुबंई उपनगरने सोलापूरचा ८४-१८ असा पराभव केला. उपनगर कडून चढाईत कोमल देवकर तर पकडी मध्ये कर्णधार राणी उपहारने चांगला खेळ केला.
पहिल्या दिवशी पुणे, मुंबई उपनगर, रायगड व सांगली या चार जिल्ह्याच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) विजयी सलामी दिली
पहिल्या दिवसाचे निलाल संक्षिप्त स्वरूपात:
पुरुष विभाग
१) रत्नागिरी ४९ विरुद्ध नाशिक २८
२) पुणे ४५ विरुद्ध बीड १५
३) जालना ५१ विरुद्ध हिंगोली २७
४) कोल्हापूर ३४ विरुद्ध पालघर २७
५) धुळे ६४ विरुद्ध लातूर २९
६) ठाणे ५२ विरुद्ध परभणी २४
७) रायगड ५२ विरुद्ध सातारा १४
८) सांगली ६५ विरुद्ध जळगाव २१
९) अहमदनगर ३९ विरुद्ध सिंधुदुर्ग १९
१०) मुंबई उपनगर ५१ विरुद्ध औरंगाबाद २०
११) नंदुरबार ३६ विरुद्ध सोलापूर ३२
१२) मुंबई शहर ५२ विरुद्ध उस्मानाबाद २२
महिला विभाग
१) नाशिक ५३ विरुद्ध परभणी ३०
२) पालघर ६६ विरुद्ध लातूर ०८
३) सांगली३१ विरुद्ध धुळे २८
४) रायगड ६७ विरुद्ध जळगाव २८
५) मुंबई उनगर ८४ विरुद्ध सोलापूर १८
६) पुणे ७३ विरुद्ध उस्मानाबाद ०२
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय
–भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा