Khashaba Jadhav Padma shri Award :- सध्या पॅरिस येथे ऑलिंपिक्स स्पर्धा (Paris Olympic 2025) खेळल्या जात आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतायेत. यादरम्यान पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक्स मेडल मिळवून देणाऱ्या दिवंगत खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्यांनी सुरू केल्याचे सांगितले.
भारतासाठी ऑलिंपिक्समध्ये सर्वात पहिले वैयक्तिक मेडल जिंकून देण्याचा कारनामा खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले होते. त्यांनी 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक्समध्ये कुस्तीत कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर थेट 2008 मध्ये सुशील कुमार याने भारताला कुस्तीत ऑलम्पिक मेडल मिळवून दिले. त्यामुळेच खाशाबा यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी मोहोळ यांनी केली.
ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये कुस्ती हा आवडीचा खेळ आहे. महाराष्ट्राच्या याच मातीतून पुढे आलेल्या खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक मेडल मिळवून दिले. त्यानंतर महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींची मागणी होती की खाशाबा जाधव यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा. यासाठी मी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली. क्रीडा मंत्रालयाकडून भारत सरकारकडे ही मागणी करण्यात यावी अशी विनंती त्यांना केली आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांची देखील याच मुद्द्यावर भेट होणार आहे.”
स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित केलं जावं, ही समस्त कुस्ती विश्वाची इच्छा असून पद्म पुरस्कारासाठीची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडून केली जावी, यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री मा.श्री. मनसुख मांडविया यांची भेट घेतली. याचीच… pic.twitter.com/wujMiWh8rW
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 1, 2024
खाशाबा जाधव हे कोल्हापूरचे रहिवासी होते. त्यांना ऑलिंपिक्ससाठी पाठवण्याकरिता त्याकाळी राजाराम कॉलेजमध्ये वर्गणी मागितली गेल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हेलसिंकी येथे झालेल्या या स्पर्धांच्या सामन्यावेळी देखील त्यांना अपुरी माहिती मिळाल्याने ते तयार देखील होऊ शकले नव्हते. केवळ सामना पाहण्यासाठी गेलेले असताना, अचानक त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते मॅटवर उतरले आणि देशासाठी पहिले पदक मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
कोल्हापूरकर स्वप्नील कुसाळेसाठी सतेज पाटलांनी पेटारा उघडला, जाहीर केलं मोठं बक्षीस
एकच चर्चा- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या स्वप्निलने कोणती अंगठी घातली होती हातात?
मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जगभर काैतुक, पंतप्रधान मोदींची कांस्य पदक विजेत्यासाठी खास पोस्ट