---Advertisement---

‘ओ महाराज ओ महाराज’ म्हणत पुणेकरांनी आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजला पिडले

On: सोमवार, ऑक्टोबर 14, 2019 5:47 PM
---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान दुसरा कसोटी सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे पार पडला. या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजला सामना पहायला स्टेडीयममध्ये आलेल्या प्रेक्षकांनी ‘ओ महाराज ओ महाराज’ असे म्हणत हैराण केले होते.

सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की महाराज या सामन्यादरम्यान बाउंड्रीलाईन जवळ उभा असताना प्रेक्षक ‘ओ महाराज ओ महाराज’ असे ओरडत होते.

या सामन्यात महाराजला क्षेत्ररक्षण करताना खांद्याची दुखापत झाली आहे. पण या दुखापतीनंतरही त्याने दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात 22 धावांची खेळी केली.

मात्र महाराज खांद्याच्या दुखापतीमुळे तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी फिट नसल्याने तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेने जॉर्ज लिन्डची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे.

पुण्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा कसोटी सामना 19 ऑक्टोबरपासून रांचीमध्ये सुरु होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---