प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटचा लेग पुणे येथे सध्या सुरु आहे. आज लेगच्या चौथ्या दिवशी हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात हरियाणाने ३१-२७ असा विजय मिळवला. या विजयचा शिल्पकार ठरला हरियाणाचा रेडर प्रशांत कुमार राय.
सामन्याची सुरवात कर्णधार दीपक निवास हुडाने बोनस आणि एक टच गुण मिळवून केली तर हरियाणाच्या प्रशांत कुमारने लगेच पहिल्या रेडमध्ये धर्मनाथ चेरलाथनला बाद केले. दोन्ही संघ पहिल्या सत्रात हळू खेळले, फक्त तिसऱ्या म्हणजेच डू ऑर डाय रेडमधेच रेडर धोका पत्करत होते.
पहिल्या पाच मिनिटात पुण्याकडे बढत होती पण डिफेन्स आणि रेडरच्या खराब प्रदर्शनामुळे ९व्या मिनिटाला स्कोर ९-९ असा सामान संख्येवर आला. हरियाणाकडून प्रशांतकुमार रायने ३ गुण मिळवले तर पुणेरी पलटणच्या कर्णधार दीपकने ४ गुण मिळवले. पहिल्या सत्रा अखेर दोन्ही संघ ११-११ असे बरोबरीत होते.
पुण्यासाठी दुसऱ्या सत्राची सुरवात गिरीश एर्नाकने एक उत्तम टॅकल करून केली. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघ डू ओर डायवर खेळात होते. पण ६व्या मिनिटाला पुण्याच्या कर्णधाराने २ गुणांची रेड करून सामन्यात पुण्याचे पुनरागमन करून दिले. स्कोर पुणे १५ आणि हरियाणा १५ असा झाला. पण पुढच्याच रेडमध्ये हरियाणाच्या प्रशांत कुमार रायने सुपर रेड करून स्कोर बरोबरीत आणला.
पुण्याच्या संघावर स्कोर बरोबर असतानाही दबाव होता कारण पुण्याचे फक्त २ खेळाडू मॅट वर होते. १०व्या मिनिटाला रवी कुमार आणि रिंकू नरवाल यांनी सुपर टॅकल करून पुण्याला १ गुणांची बढत मिळवून दिली पण हरियाने लगेचच सामना बरोबरीत आणला. रिंकू नरवालने आणखी एक सुपर टॅकल करून पुण्याला २ गुणांची बढत मिळवून दिली.
५व्या मिनिटाला गिरीशच्या २ गुणांच्या रेडमुळे कर्णधार दीपक हुडा आणि धर्मनाथ चिरलाथन मॅटवर परत आले. पण अखेर सामना संपण्यासाठी ४ मिनिट राहिले असताना पुणे ऑल आऊट झाली पण तरी सुद्धा हरियाणाकडे फक्त एका गुणांची बढत होती. पण अखेर खराब डिफेन्समुळे सामना पुण्याला सामना ४ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला.