मुंबई, १९ जून २०२३: अल्टिमेट टेबल टेनिस ( UTT) लीगच्या चौथ्या पर्वाचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. गतविजेत्या चेन्नई लायन्सविरुद्ध पुणेरी पलटण यांच्या लढतीने १३ जुलैपासून पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात या लीगला सुरुवात होणार आहे.
सहा फ्रँचायझींमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह एकूण १८ रोमांचक लढती संध्याकाळी ७.३० वाजता खेळवल्या जातील. स्पोर्ट्स १८ आणि JioCinema वर सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने २८ आणि २९ जुलैला होणार असून ग्रँड फिनाले ३० जुलैला होणार आहे. भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या संयुक्त विद्यमाने नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित लीगचा प्रचार केला आहे.
चेन्नई लायन्स, पुणेरी पलटण, बंगळुरू स्मॅशर्स, दबंग दिल्ली टीटीसी, गोवा चॅलेंजर्स आणि यू मुंबा टीटी या फ्रँचायझी प्रतिष्ठित विजेतेपदासाठी लढणार आहेत. बंगळुरू स्मॅशर्स आणि यू मुंबा टीटी हे १४ जुलैला, तर दबंग दिल्ली टीटीसी आणि गोवा चॅलेंजर्स हे संघ १५ जुलैला लीगमधील आपल्या प्रवासाला सुरूवात करतील.
UTT सीझन ४ मध्ये भारतीय स्टार्स अचंता शरथ कमल, मनिका बत्रा आणि साथियन ज्ञानसेकरन यांच्यासह आफ्रिकन खेळाडू क्वाद्री आरुना (WR16) आणि अमेरिकेची लिझी झँग (WR24) या टॉप ग्लोबल स्टार्सची उपस्थिती असणार आहे. तरुण भारतीय खेळाडूंना संधी देण्याच्या UTT च्या परंपरेला अनुसार सीझन ४ मध्ये पायस जैन, एसएफआर स्नेहित आणि दिया चितळे यांच्यासह अनेक उदयोन्मुख खेळाडूही लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. (Puneri Paltan will face the defending champions in the first match, the schedule of Ultimate Table Tennis has been announced)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: बीसीसीआयकडून नव्या निवडसमितीची घोषणा, यांच्या खांद्यावर दिली जबाबदारी
असलं चालणार नाही! बीसीसीआयने दाखवली पीसीबीच्या ‘त्या’ प्रस्तावाला केराची टोपली!