---Advertisement---

पुणेरी पलटणचा तमिळ थलाईव्हाजला पराभवाचा दणका, १२ गुणांच्या फरकाने सामना खिशात

On: मंगळवार, फेब्रुवारी 15, 2022 11:05 PM
Pune-Chennai
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेला प्रो कबड्डीचा १२१ वा सामना पुणेरी पलटण आणि तमिळ थलाईव्हाज यांच्यात झाला. पुणेरी पलटणनने ४३-३१ च्या फरकाने हा सामना जिंकला आहे. हा त्यांचा हंगामातील नववा विजय होता. 

तत्पूर्वी प्रो कबड्डीचा १२० वा सामना टेबल टॉपर पटणा पायरेट्स आणि बंगळुरू बुल्स यांच्यात झाला. पटणा पायरेट्सने ३६-३४ च्या फरकाने हा सामना जिंकत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. तसेच प्रो कबड्डीचा ११९ वा सामना यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. जयपूर पिंक पँथर्सने ४४-२८ च्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आहे. हा त्यांचा हंगामातील नववा विजय होता. यासह त्यांनी गुणतालिकेत सहाव्या स्थानी उडी घेतली आहे. 

प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत १९ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १४ सामने जिंकत ७५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ६५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यूपी योद्धा (६३ गुण), हरियाणा स्टिलर्स (६३ गुण), बेंगलुरू बुल्स (६० गुण) टॉप-५ मध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

एटीके मोहन बागानची विजयी हॅटट्रिक; मनवीर सिंगच्या दोन गोलने एफसी गोवाला नमवले

मूर्ती लहान पण कीर्ती महान! आयपीएल २०२२ चे ५ सर्वात युवा धुरंधर, विश्वविजेत्या कर्णधाराचा समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---