बुधवारी (दि. 3 मे) आयपीएल 2023चा 46वा सामना पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हा सामना मुंबईने सामना 6 विकेट्सने नावावर केला. या सामन्यात मुंबईने तब्बल 215 धावांचा डोंगर पार केला. पंजाबचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या अर्शदीप सिंग याच्यावर हल्ला चढवत मुंबईचा फलंदाजांनी त्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा करून टाकला.
या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. पंजाबच्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 7 चेंडू शिल्लक ठेवत 216 धावा केल्या. तसेच, हा सामना 6 विकेट्सने जिंकला. यामध्ये सर्वाधिक धावा अर्शदीप याच्या गोलंदाजीवर वसूल केल्या गेल्या. अर्शदीप सिंग याने 3.5 षटकात 66 धावा खर्च केल्या. पर्पल कॅप जिंकण्याच्या शर्यतीत असलेल्या अर्शदीपची ही कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी ठरली.
यासोबतच तो 4 पेक्षा कमी षटके टाकताना सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. यापूर्वी न्यूझीलंडच्या बेन व्हीलरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3.1 षटकात 64 धावा खर्च केल्या होत्या. अर्शदीपने या सामन्यात टाकलेल्या 23 चेंडूंपैकी 12 चेंडूंवर चौकार-षटकार वसूल केले गेले. यामध्ये आठ चौकार व चार षटकारांचा समावेश होता. यावर बरोबर त्याने 2 वाईड चेंडूही टाकले.
विजयाची संधी असताना मिळालेल्या या पराभवामुळे पंजाबची प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी काही अंशी कमी झाल्याचे दिसते. त्यांनी दहा सामन्यात 5 विजय व 5 पराभव स्वीकारले आहेत. उर्वरित चार सामन्यात कमीत कमी तीन विजय मिळवून आपली संधी कायम राखावी लागेल. पंजाब 2014 नंतर केव्हाही आयपीएल प्ले ऑफ खेळलेला नाही.
(Arshdeep Singh Have Worst World Record In T20 Against Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितला ट्रोल करणाऱ्या पंजाबला मुंबईने दाखवला इंगा; ओढवली ट्वीट डिलीट करण्याची नामुष्की
‘हेच दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी मेडल जिंकले होते?’, पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत रडली कुस्तीपटू