क्रिकेटजगतात बऱ्याचदा वेगवेगळ्या क्रिकेटपटूंची एकमेकांशी तुलना केली जात असते. एखाद्या खेळाडूमध्ये आजी-माजी क्रिकेटपटूची झलक दिसल्याने हे तुलनेचे सत्र सुरू होते. आयपीएलच्या पंजाब किंग्ज संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स अनिल कुंबळे यांनाही एका नवोदित शिलेदारात मुंबई इंडियन्सच्या धाकड अष्टपैलू कायरन पोलार्ड याची झलक दिसली आहे. हा क्रिकेटपटू म्हणजे, ‘शाहरुख खान’.
एप्रिल ९ ते मे ३०, या कालावधीत होणाऱ्या आयपीएल २०२१ साठी सर्व खेळाडू सराव सत्रात घाम गाळत आहेत. २५ वर्षाय शाहरुखने पहिल्याच हंगामात आपली छाप सोडण्यासाठी कंबर कसली आहे. आपण मुंबईच्या नेट्समध्ये पोलार्डला गोलंदाजी केली असून शाहरुखमध्ये पोलार्डसारखी क्षमता दिसल्याचे कुंबळेंनी सांगितले आहे.
“शाहरुख नेहमी मला पोलार्डची आठवण करुन देतो. जेव्हा मी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होतो, तेव्हा पोलार्ड नेट्समध्ये खूप खतरनाक खेळत असे. मी त्याला नेट्समध्ये थोडीफार गोलंदाजी करायचो. यावेळी सरळ शॉट मारत जाऊ नकोस, मी इथे चेंडू पकडण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही, असे म्हणायचो. आता माझे वय वाढले आहे आणि माझे शरीर मला पुरेसी साथ देत नाही. त्यामुळे शाहरुख नेट्समध्ये फलंदाजी करताना मी त्याला अजिबात गोलंदाजी करु इच्छित नाही,” अशा शब्दात त्यांनी स्तुतिसमुने उधळली आहेत.
अनिल कुंबळेसारख्या महान क्रिकेटपटूने आपले कौतुक केल्याने पाहून शाहरुख भलताच खुश झाला. तो म्हणाला की, “माझ्यासाठी ही खूप मोठी बाब आहे की कुंबळेसारख्या दिग्गजाने माझ्याविषयी असे शब्द म्हटले. मी पंजाब संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांशी फार बोलत असतो. त्यांच्याकडून मला क्रिकेटविषयी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.”
“He reminds me a bit of Pollard!” ????
???????????????????? da apna ???????????????? ????#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 pic.twitter.com/yO4MCbDCpJ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 4, 2021
देशांतर्गत पातळीवर तमिळनाडू संघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या शाहरुखला यंदा पंजाब किंग्जने ५.२५ कोटींना विकत घेतले होते. २० लाखांच्या मुळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या या खेळाडूला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनी बोली लावली होती. अखेर प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने त्याला आपल्या गोटात दाखल केले.
महत्त्वाच्या बातम्या-
शेळीपालन ते शिक्षकाची नोकरी; वयाची तिशी पार केलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा प्रवास वाचून पाणावतील डोळे
फेक फिल्डिंगने हुकवलं फखर जमानचं द्विशतक, पाकिस्तानी दिग्गजाने क्विंटन डीकॉकला सुनावली खरीखोटी






