शुक्रवार रोजी (३० एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएल २०२१ चा २६ वा सामना झाला. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेला हा सामना पंजाबने ३४ धावांनी जिंकला. यासह हंगामातील तिसरा विजय नोंदवत त्यांनी गुणतालिकेत पाचव्या स्थानी उडी घेतली आहे. पंजाबच्या या विजयात कर्णधार केएल राहुल याने महत्त्वाची भूमिका बजावली. तरीही त्याने स्वत:ला विजयाचे श्रेय न घेता आपल्या संघसहकाऱ्यांना दिले.
सामन्यानंतरच्या सादरीकरणात संघाच्या कामगिरीबाबत सविस्तर माहिती देताना ख्रिस गेल आणि हरप्रीत ब्रार यांना संघाच्या विजयाचे नायक म्हटले. तो म्हणाला की, “अहमदाबादच्या खेळपट्टीवर आम्हाला एका फिरकीपटूची गरज होती. अशात त्याने (हरप्रीत) येत गोलंदाजीसह फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले. मी आतापर्यंत जेवढे क्रिकेट खेळले आहे, तेवढा अनुभव मी सर्वांसोबत शेअर केला आहे. मागील चार सामन्यात आम्ही विजयाच्याा जवळ जाऊन पराभूत झालो होतो. त्यामुळे या सामन्यात मी पुढाकार घेऊन खेळलो.”
पुढे संघातील विस्फोटक फलंदाज गेलचे कौतुक करताना तो म्हणाला की, “आपल्या सर्वांना माहिती आहे की गेलमधील प्रतिभेचा अंदाजा आहे. तो मागील दोन वर्षांपासून संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर महत्वाची भूमिका पार पाडत आहे. अशात मला फक्त पुढे येऊन संघाला मार्ग दाखवण्याची गरज होती आणि त्यात यशस्वी ठरलो.”
पंबाज-बेंगलोर सामन्यात कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ९१ धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याने ५७ चेंडू खेळले आणि ५ षटकार व ७ चौकार मारले. याबरोबरच ख्रिस गेलने २४ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकार खेचत ४६ धावांची आतिशी खेळली केली. सोबतच अष्टपैलू आणि पदार्पणवीर हरप्रीत ब्रारने नाबाद २५ धावांची छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. याबरोबरच गोलंदाजीत त्याने बेंगलोरची तिकडी बाद केली. यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा माणूस! ज्या गोलंदाजांने केले क्लीन बोल्ड, त्यालाच सामन्यानंतर भेटायला गेला विराट कोहली