---Advertisement---

प्रथमच आयपीएल लिलावात नसणार पंजाबची ‘प्रीती’; ट्विटरवर माहित देत लिहिले…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 11, 2022 5:55 PM
preity-z
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) चा आगामी हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस अथवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस सुरू होईल. तत्पूर्वी, सर्व संघांना संघबांधणी करायची आहे. यासाठी बेंगलोर येथे १२ व १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलावाचे (IPL Mega Auction) आयोजन केले गेले आहे. या मेगा लिलावासाठी सर्व संघांनी रणनीती देखील आखली असेल. त्याचवेळी, पंजाब किंग्स (Punjab Kings) संघासाठी ‌‌धक्का देणारी बातमी समोर आली.

सहमालकीण नसणार लिलावासाठी उपलब्ध

पंजाब किंग्स संघाची सहमालक प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा ही मेगा लिलावासाठी उपलब्ध नसेल. तिने एक ट्विटर पोस्ट करत लिहिले,

‘यावेळी मी आयपीएल लिलावात सहभागी होणार नाही. माझ्या लहान मुलाला सोडून मी भारतात येऊ शकत नाही. मागील काही दिवसांपासून आम्ही लिलाव व‌ क्रिकेट या विषयांवर भरपूर चर्चा केली आहे. मला चाहत्यांना ही बातमी सांगायची होती. तसेच, त्यांनी यावर्षी कोणत्या खेळाडूंना पंजाबसाठी खेळताना पाहायला आवडेल हेही सांगावे.’ प्रीती झिंटा ही दरवर्षी आयपीएल लिलावात पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसत होती.

वसीम जाफरने सोडली संघाची साथ

मागील तीन वर्षांपासून पंजाब संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वसीम जाफर याने संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आयपीएल लिलावात मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे हे पंजाब संघाचे नेतृत्व करताना दिसतील.

दोन खेळाडूंना केले रिटेन

आयपीएल २०२२ पूर्वी पंजाब किंग्सने केवळ दोन संघांना कायम केले. यामध्ये सलामीवीर मयंक अगरवाल व वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. या दोघांना अनुक्रमे ११ कोटी व‌‌ ४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. पंजाब मेगा लिलावात सर्वाधिक ७२ कोटी रुपये घेऊन सहभागी होईल. पंजाब संघ मागील ७ वर्षांपासून प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकला नाही.

महत्वाच्या बातम्या-

‘अच्छा चलता हूँ…’, म्हणत जाफरने घेतला पंजाब किंग्सचा निरोप, संघासाठी निभावत होता ‘ही’ भूमिका फलंदाजीत फ्लॉप, तरी रोहित-शिखरने रचला इतिहास! ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच सलामी जोडी 

INDvWI: तिसऱ्या वनडेत भारताने जिंकला टॉस, ११ जणांच्या संघातून केएल राहुलसह ४ खेळाडू बाहेर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---