---Advertisement---

आयपीएल स्पर्धेत फ्लॉप ठरलेला ‘हा’ फलंदाज सीपीएलमध्ये पार पडणार कर्णधारपदाची जबाबदारी

On: सोमवार, मे 24, 2021 12:58 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कडक बायो बबल असताना देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. एका पाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ताबडतोड क्रिकेट पाहण्याची संधी मिळत नाहीये. परंतु, येत्या काही दिवसातच कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचा फलंदाज नवीन भूमिका साकारताना दिसून येणार आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला फलंदाज निकोलस पूरन लवकरच कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत कर्णधाराची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. क्रिस ग्रीनला रिलीज करण्यात आल्यामुळे गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी निकोलस पुरन सांभाळणार आहे.

निकोलस पुरनची आयपीएल २०२१ स्पर्धेतील कामगिरी पहिली तर त्याने या स्पर्धेत ७ सामने खेळले होते. यात त्याला अवघ्या २८ धावा करण्यात यश आले होते. विशेष म्हणजे तो ४ वेळा शुन्यावर बाद झाला होता.

गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने ११ खेळाडूंना रिटेन केले आहे. तसेच गतवर्षी जमाईका थालावास संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या आंद्रे रसलवर पुन्हा एकदा संघाने विश्वास दाखवला आहे. बार्बाडोस ट्रायडेट्स संघाला दोन वेळेस जेतेपद मिळवून देणारा कर्णधार जेसन होल्डर याला पुन्हा एकदा संघाचे नेतृत्वपद देण्यात आले आहे. गतवर्षी जेतेपद पटकावणारा संघ, ट्रिनबागो नाईट रायडर्सने अनुभवी ड्वेन ब्रावोला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर त्याला नेव्हिस पेट्रीयॉट्स संघाने ट्रेड केले आहे.

ड्वेन ब्रावो ऐवजी नाईट रायडर्स संघात दिनेश रामदीनची एन्ट्री झाली आहे. तर संघाचे नेतृत्वपद यंदाही कायरोन पोलार्डला देण्यात आले आहे. गतवर्षी, पोलार्डच्या नेतृत्वात ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाने जेतेपद पटकावले होते. तसेच डॅरेन सॅमीने नेतृत्वपदावरून माघार घेतल्यामुळे सेंट लूसिया जोक्स संघ यंदा नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. तो सल्लागार आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून संघाबरोबर राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोरोना रूग्णांचे इरफानने ‘इतके’ किलोमीटर धावत वाढवले धैर्य; व्हिडिओ पोस्ट करत दिली महत्त्वपूर्ण माहिती

गांगुलीला चित्रपटात प्रमुख भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध निर्मत्याने केला होता फोन; दादाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

बांगलादेशने सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेचा ३३ धावांनी पहिल्या वनडेत उडवला धुव्वा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---