प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्जनं आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नसली तरी क्रिकेटबद्दलचा तिचा उत्साह कधीच कमी होत नाही. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रीती झिंटानं तिला पंजाब किंग्जच्या खेळाडूंसाठी 120 पराठे का बनवावे लागले हे सांगितलं आहे.
व्हिडिओमध्ये प्रीती झिंटा सांगते की, “आम्हाला आलू पराठा खायचा होता. मात्र एका हॉटेलनं आम्हाला अत्यंत बेचव पराठा खायला दिला. यावर मी म्हणाले की, मी तुम्हाला पराठा बनवायला शिकवेन. यानंतर पंजाबच्या खेळाडूंनी मला विचारलं की मी हे करेन का. मी म्हणाले, हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही एखादा मोठा विजय नोंदवला. यानंतर ते सामना जिंकले. मग मी ही म्हणाले की, ठीक आहे. त्यानंतर मला त्यांच्यासाठी 120 पराठे बनवावे लागले.”
प्रीती झिंटाचा हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. प्रीतीचे चाहते तिच्या क्रिकेटवरच्या प्रेमाचं खूप कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
आयपीएलच्या आतापर्यंतच्या 16 हंगामात पंजाब किंग्सची टीम फारशी चमकदार कामगिरी करू शकलेली नाही. त्यांनी केवळ दोनदाच प्लेऑफ गाठलं आहे. दोन्ही वेळा त्यांना ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नाली. 2014 मध्ये त्यांनी पहिली आणि शेवटची अंतिम फेरी गाठली होती. विजेतेपदाच्या लढतीत त्यांना गौतम गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
आयपीएल 2024 मध्येही पंजाबची कामगिरी आतापर्यंत काही विशेष राहिलेली नाही. संघानं हंगामाची सुरुवात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 विकेट्सनं विजय मिळवून केली. परंतु त्यानंतर त्यांना 5 सामन्यांत केवळ 1 विजय नोंदवता आला आहे. पंजाब किंग्जनं आतापर्यंत 6 पैकी 4 सामने गमावले आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली तर यावेळीही त्यांना प्लेऑफ गाठणं सोपं जाणार नाही. शेवटच्या सामन्यात पंजाबला राजस्थान रॉयल्सकडून 3 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्ज अडचणीत, कर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त; जाणून घ्या किती सामने खेळणार नाही
अंगावर काटे आणणाऱ्या सामन्यात राजस्थानचा पंजाबवर 3 गडी राखून विजय