---Advertisement---

CSKvPBKS: कोण आहेत हे माय-लेक, ज्यांनी लाखो सामना दर्शकांचे वेधले लक्ष? घ्या जाणून

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 11:08 AM
---Advertisement---

आयपीएल 2021 ला सुरूवात झाली असून त्यामधील आठ सामनेसुद्धा झाले आहेत. यामध्ये शुक्रवार (16 एप्रिल) रोजी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील आठवा सामना खेळला झाला. या सामन्यात सीएसकेने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला.

यामध्ये सामना पाहायला आलेल्या एका स्त्रीचा आणि एका गोंडस मुलाचा फोटो सध्या व्हायरल होत असून एकीकडे काही लोक या फोटो कौतुक करीत आहेत. तर काही लोक टीका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर चला मग ही स्त्री आणि गोंडस मुलगा कोण आहेत? ते जाणून घेऊया…

आयपीएल सामने चालू आहेत आणि सामन्यातील फोटो व्हायरल झाले नाहीत असे कधी होऊच शकत नाही. त्यामध्ये सध्याही एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोत एक स्त्री तिच्या गोंडस मुलाला घेऊन उभी राहिलेली दिसत आहेत. ती आपल्या चिमुकल्या मुलाकडे पाहून गोड हसताना दिसत आहे. त्या मुलाच्या चेहऱ्यावरील निरागसपणाने सर्वांचेच मन जिंकले आहे.

हा फोटो पंजाब किंग्जचा खेळाडू मनदीप सिंगची पत्नी आणि त्यांच्या मुलाचा आहे. हे दोघेही सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले होते.

https://twitter.com/IPL/status/1383046809866543105?s=20

सध्या हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून काही लोक या फोटोचे कौतुक केले आहे. तर कोरोनामुळे मुलाला धोकाही निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांनी स्टेडियमवर यायला नको होते अशी टीका देखील काहींनी केली आहे.

https://twitter.com/17Tahir/status/1383047136254775296?s=20

https://twitter.com/BCMc69/status/1383047153010970634?s=20

https://twitter.com/srushtibp/status/1383048113175207937?s=20

https://twitter.com/imNSjadhaw/status/1383049452806574082?s=20

https://twitter.com/MulluRambabu1/status/1383086369912754180?s=20

या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, पंजाब संघाच्या फलंदाजीची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी केवळ 57 धावांवरती 6 गडी गमावले. यामध्ये फक्त युवा फलंदाज शाहरुख खानच्या खेळीच्या जोरावर पंजाबचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा करू शकला. चेन्नईकडून दीपक चहरने शानदार गोलंदाजी करत 4 षटकांत 13 धावा देऊन 4 गडी बाद केले. तर दुसर्‍या डावात फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नई संघातील फाफ डु प्लेसिसच्या 36 आणि मोईन अलीच्या 46 धावांच्या जोरावर 15.4 षटकांत 4 गडी गमावून 107 धावा केल्या. यामध्ये पंजाबकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने 2 गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कर्णधार माझ्या पाठीशी, म्हणूनचं चांगली कामगिरी करु शकलो,’ सामनावीर चहरचे मनाला भावणारे वक्तव्य

आशीर्वाद लाखाचा! सामन्यापुर्वी चाहर शमीच्या पाया पडला अन् मैदान मारलं, पाहा तो नेत्रदिपक क्षण

बलाढ्य चेन्नईचा पंजाबवर एकहाती विजय, कर्णधार राहुलने ‘यांना’ दारुण पराभवास धरले जबाबदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---