---Advertisement---

पंजाब किंग्जला मजबूती, १४ कोटींच्या खेळाडूच्या जागी इंग्लंडच्या ‘या’ श्रेयस्कर गोलंदाजांची निवड

Adil Rashid And Team England
---Advertisement---

लवकरच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. आयपीएलसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहे. अशात आयपीएल संदर्भातील अनेक चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. काही खेळाडू दुखापतीमुळे, तर काही खेळाडू वैयक्तिक कारणामुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाहीत.

अशात अनेक संघांनी उपलब्ध नसलेल्या खेळाडूंच्या जागी नवनवीन खेळाडूंना सामील केले आहे. त्यातच आता पंजाब किंग्जच्या ताफ्यातून एक बातमी समोर आली आहे. पंजाब किंग्सने झाय रिचर्डसन ऐवजी इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदला संघात सामील केले आहे. पंजाब किंग्सने ‘प्रेसनोट’ जारी करत या बाबतची माहिती दिली.

रीचर्डसनने दुखापतीमुळे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून आपले नाव मागे घेतले आहे. पंजाब किंग्जच्या संघाने रिचर्डसनला यंदाच्या हंगामात १४ कोटींची भरघोस रक्कम देऊन संघात सामील केले होते. मात्र, त्याच्याकडून आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात म्हणावे तसे प्रदर्शन झाले नाही. रीचर्डसनने पहिल्या टप्प्यात केवळ ३ सामने खेळले, ज्यामध्ये त्याला केवळ ३ च विकेट्स मिळाल्या. याआधीच पंजाब किंग्सने रिले मेरेडिथ ऐवजी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसला संघात सामील केले होते.

तसेच रशीद इंग्लंडकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. रशिदने आतापर्यंत ६२ सामन्यांमध्ये ६५ विकेट घेतल्या आहे. त्याचबरोबर हा त्याचा पहिलाच आयपीएल हंगाम असणार आहे.

नुकत्याच झालेल्या ‘द हंड्रेड’ या १०० चेंडूंच्या स्पर्धेमध्ये रशीदने ‘नॉर्दन सुपरचार्जर’चे प्रतिनिधित्व केले होते. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत १२ विकेट्स देखील घेतल्या होत्या. त्यामुळे रशीद पंजाब किंग्सकडून खेळताना महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

दरम्यान, आतापर्यंत झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्सने ८ सामन्यांमध्ये ३ सामने जिंकले आहेत. यासह पंजाब किंग्सचा संघ गुणतालिकेत ६ गुणांसह ६ व्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता? ३७.५० कोटी देऊन खरेदी केलेले ‘हे’ क्रिकेटर दुसऱ्या टप्प्यातून बाहेर; बघा यादी
आयर्लंडच्या सलामीवीराचे टी२०त नाबाद शतक, चक्क १६४ धावांनी जर्मनीला चारली धूळ
एका वर्षात दोनदा केली रूटने अशी ‘लय भारी’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---