इंडियन प्रमियर लीग २०२२ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. या हंगामात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. मैदाना खेळाडू जिद्दीने खेळताना दिसत आहे. पण, मैदानात कितीही ताणतणावाचे वातावरण असले, तरी मैदानाबाहेर मात्र खेळाडू मजामस्ती करताना दिसत आहेत. नुकताच पंजाब किंग्सने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात ओडियन स्मिथ याच्या शिंकण्यानंतर पंजाबचे खेळाडू पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली पडले.
पंजाब किंग्सने (Punjab Kings) त्यांचा अष्टैपैलू खेळाडू ओडियन स्मिथ (Odean Smith) याचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे की, ‘ओडियन स्मिथ म्हणत असेल, काय हलवून टाकलं ना? (क्यूं हिला डाला ना?)’
या व्हिडिओमध्ये दिसते की, ओडियन स्मिथ चालत येतो आणि जोरात शिंकतो. त्याचवेळी त्याच्यासमोर गादी घेऊन उभे असलेले पंजाबचे खेळाडू अचानक ओरडत खाली पडायला लागतात. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून अनेक मजेदार प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत.
Odean be like: Kyun hila dala na⁉️ 😂#PunjabKings #SaddaPunjab #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #OdeanSmith pic.twitter.com/VpKzKMB95Y
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 15, 2022
पंजाबसाठी करो वा मरोचा सामना
पंजाबला सोमवारी (१६ मे) दिल्लीविरुद्ध साखळी फेरीतील १३ वा सामना खेळायचा आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो वा मरो’ अशा स्थितीतील असणार आहे. कारण, आयपीएल २०२२ प्लेऑफमध्ये (IPL 2022 Playoffs) जागा मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. सध्या दिल्ली १२ सामन्यांतील ६ विजयांसह आणि १२ गुणांसह गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहे. तसेच पंजाब संघ देखील १२ सामन्यांतील ६ सामन्यात विजय मिळवून १२ गुणांसह ७ व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना सोमवारी होणारा सामना महत्त्वाचा आहे.
गुणतालिकेत सध्या २० गुणांसह गुजरात टायटन्स अव्वल क्रमांकावर असून त्यांनी पहिल्या दोन स्थानांमध्ये आपली जागा पक्की केली आहे. तसेच मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ यापूर्वीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे प्लेऑफसाठी उर्वरित ३ जागांसाठी ७ संघात सध्या स्पर्धा पाहायला मिळत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ मध्ये इतिहासातील सर्वाधिक षटकारांची बरसात; ‘या’ संघाने सर्वाधिक चेंडू केले सीमापार
‘तो निर्णय चूकला’, गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर ‘कॅप्टनकूल’ धोनीने मान्य केली चूक
अँड्र्यू सायमंड्सला ‘रॉय’ का म्हणतात तरी का? रोचक आहे कारण