देशाची राजधानी दिल्लीत आयपीएलसारखी नव्या टी20 लीगला सुरूवात झाली आहे. ज्याचे नाव दिल्ली प्रीमियर लीग आहे. या लीगच्या पहिल्याच सामन्यात लखनऊचा सुपर जायंट्सचा युवा खेळाडू आयुष बदोनीने 4 चेंडूत बॅक टू बॅक 4 षटकार खेचत सामन्यात जोर भरला. बदोनीच्या या खेळीच्या जोरावर त्याची टीम साऊथ दिल्ली सुपरस्टार्सने रिषभ पंतच्या टीम पुरानी दिल्लीला 3 विकेट्सने पराभूत करण्यात यश मिळविले. बदोनीने रिषभ पंतच्या संघाविरुद्ध 29 चेंडूत 57 धावांची मॅचविनिंग खेळी खेळली.
वास्तविक, सामन्याचा दुसऱ्या डावात गोलंदाजी करत पुरानी दिल्ली संघाचा फिरकी गोलंदाज अंकित भधाना ओव्हर टाकायला आला. ज्याचा सामना आयुष बदोनीने केला. ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर फक्त दोन धावा झाल्या, पण त्यानंतर पुढच्या चार चेंडूंवर बदोनीने चार षटकार ठोकले. त्याच्या उत्तुंग षटकारांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पाहा व्हिडिओ-
Skipper Badoni goes big ????????#JioCinemaSports #DelhiPremierLeagueT20 #DPLT20 #DilliKiDahaad pic.twitter.com/R9cJCDZezC
— JioCinema (@JioCinema) August 17, 2024
अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील पुरानी दिल्ली 6 च्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 197 धावा केल्या. अर्पित राणाच्या 41 चेंडूत केलेल्या 59 धावांच्या खेळीच्या जोरावर पुरानी दिल्ली 6 संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आले. तर कर्णधार रिषभ पंतने 32 चेंडूत 35 धावांची संथ खेळी केली.
तर धावांचा पाठलाग करताना दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स संघाने शानदार सुरुवात केली. आणि सामना 5 चेंडू शिल्लक असताना जिंकला. ज्यामध्ये आयुष बडोनी आणि प्रियांश आर्य यांनी निर्णायक खेळी खेळली. दोघांनी 57-57 धावा केल्या. परिणामी संघ 3 विकेट्स आणि 5 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला.
हेही वाचा-
भुवनेश्वर कुमारने पत्नीचा वाढदिवस बनवला खास, दिले शानदार सरप्राईज; होतंय कौतुक!
बॉर्डर-गावसकर मालिकेत बुमराहसोबत नवा गडी टीम इंडियात उतरणार? जय शाह स्पष्टच म्हणाले…
“यासाठी कठोर शिक्षा आवश्यक होती”, जय शाहांचे इशान आणि अय्यरबाबत मोठे वक्तव्य






