इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. या विजयामुळे दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात दिल्लीचा वेगवान वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 4 बळी घेतले. आता तो स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यामुळे तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. या सामन्यानंतर त्याने त्याच्या गोलंदाजीबद्दल आणि अंतिम सामन्यातील तयारीबद्दल भाष्य केले आहे.
आजचा दिवस माझा होता -रबाडा
सामन्यानंतरच्या पुरस्कारवितरण सोहळ्यात बोलताना रबाडा म्हणाला की, “आजचा दिवस फक्त माझा होता, मला असं वाटत नाही की मी तीन बळी घेतलेल्या षटकांत काही विशेष गोलंदाजी केली. परंतु असे बऱ्याच वेळा होते, आपण चांगली गोलंदाजी करतो, परंतु आपण ते पुरस्कारासाठी करत नाही. तो विषय वेगळा आहे. आमचे प्राधान्य स्पर्धा जिंकणे हेच आहे. जर आम्ही स्पर्धा जिंकलो आणि मला बळी घेण्यात अपयश आले तरीही मला काहीच हरकत नाही.”
अंतिम सामन्यात करावी लागेल चांगली कामगिरी
सामन्यात शेवटचे षटक फेकणारा रबाडा पुढे म्हणाला की, “हे आव्हानात्मक काम असतं. आम्ही या स्थितीचा बऱ्याच वेळा सामना केला आहे. माझ्या कारकीर्दीत मी ही जबाबदारी बऱ्याच वेळा पार पडली आहे. आत्ता आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलेलो आहोत. सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला याचा मला आनंद आहे. आता अंतिम सामन्यात आम्हाला अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. मागील सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर चांगला खेळला होता. म्हणून आम्हाला त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी करायची होती. तो एक उत्तम खेळाडू आहे. आम्ही डावाच्या सुरुवातीला लवकर विकेट घेतल्यामुळे आमच्यासाठी काम सोपे झाले.”
अशा आहे की इतिहास घडेल
दिल्ली अंतिम सामन्यात मुंबईचा सामना करेल. हा सामना बुधवारी (10 नोव्हेंबर) होणार आहे. या सामन्याबद्दल बोलताना रबाडा म्हणाला की, “आयपीएल सुरू झाल्यापासून दिल्लीने कधीही अंतिम फेरी गाठली नाही, त्यामुळे संघाला या उंचीवर नेण्यात आम्हाला आनंद झाला. आमच्याकडे तयारी करण्यासाठी 2 दिवस आहेत, थोडी विश्रांती घेऊ. आशा आहे की इतिहास घडेल. आयपीएलमधील खेळाडूंच्या विशालतेमुळे ही एक मोठी स्पर्धा आहे. त्याचबरोबर मुंबईचा संघ चांगला आहे. आमचा युवा संघ आहे. या संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करण्यास तयार आहेत.”
रबाडाची आयपीएल 2020 मधील कामगिरी
या हंगामात रबाडाने 16 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 17.79 च्या सरासरीने 29 बळी घेतले आहेत. 24 धावात 4 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा