दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी (३० डिसेंबर) दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २११ धावांची आवश्यकता असणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh pant) याने यष्टिमागे मोठा कारनामा केला आहे. त्याने एमएस धोनीला मागे टाकत १०० (Fastest 100 dismissal) बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. यानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामीी(Pushkar Singh Dhami tweet) यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. परंतु कौतुक करताना त्यांच्याकडून एक चूक घडली आहे.
तर झाले असे की, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी रिषभ पंतचे कौतुक करत लिहिले की, “१०० गडी बाद केल्याबद्दल रिषभ पंतचे अभिनंदन.” मुख्यमंत्र्यांनी केलेली ही चूक चाहत्यांच्या निदर्शनात येताच त्यांनी आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली. काही मिनिटातच त्यांना हे ट्विट डिलीट करावे लागले होते.
ट्विट चुकीचं असण्याचे कारण असे की, रिषभ पंत यष्टिरक्षक आहे. त्याने यष्टीचीत करून आणि झेल टिपून हा कारनामा केला आहे.(Pushkar Singh Dhami wrong tweet for rishabh pant)
त्यानंतर काही मिनिटातच पुष्कर सिंग धामी यांना आपली चूक कळाली आणि त्यांनी चूक सुधारून आणखी एक ट्विट केले. त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, “आपला प्रतिभावान खेळाडू रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिमागे सर्वात जलद १०० बळी घेणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आता त्याला शुभेच्छा देण्याची वेळ आली आहे.” काही दिवसांपूर्वी रिषभ पंतची उत्तराखंडचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मेरे प्यारे क्रिकेट प्रेमियों,
हमारे प्रतिभावान खिलाड़ी ऋषभ पंत टेस्ट क्रिकेट में विकेट के पीछे सबसे तेज 100 डिसमिसल करने वाले पहले भारतीय क्रिकेटर बन गए हैं। यह शुभकामनाओं का समय है।
— Pushkar Singh Dhami (Modi Ka Parivar) (@pushkardhami) December 29, 2021
त्याने हा कारनामा अवघ्या २६ व्या कसोटी सामन्यात केला आहे, तर एमएस धोनीने हा कारनामा ३६ व्या कसोटी सामन्यात केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक कसोटीत यष्टीमागे सर्वात जलद १०० बळी घेण्याच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याने हा कारनामा अवघ्या २२ व्या सामन्यात केला होता.
रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा ६ वा भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे. त्याच्याआधी एमएस धोनी, सय्यद किरमाणी, किरण मोरे, नयन मोंगिया आणि वृद्धिमान साहा यांनी शतक पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये २९४ बळींची नोंद आहे.
महत्वाच्या बातम्या :
कोरोना संक्रमित गांगुलीच्या तब्येतीविषयी आली महत्त्वाची अपडेट; अशी आहे सद्यस्थिती
“मला शमीमध्ये पोलॉक व अँडरसनची झलक दिसते”; दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
हे नक्की पाहा : हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक