---Advertisement---

रवींद्र जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर; शेअर केलेल्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनची खास कमेंट

Ravindra-Jadeja
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखापतग्रस्त आहे. दुखापतीमुळे तो आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. विश्रांतीच्या काळात जडेजाने एक खास व्हिडिओ शेअर केली आहे, जो चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा व्हिडिओ जडेजाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या डायलॅगवर बनवला आहे.

अल्लू अर्जुनचा नवीन चित्रपट ‘पुष्पा’ १७ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना हा चित्रपट आवडला असून अनेकजण चित्रपटातील डायलॅगचे दिवाने झाले आहेत. भारतीय संघाचा दिग्गज रवींद्र जडेजा देखील यापैकी एक ठरला आहे. जडेजाने ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॅगवर एक खास इंस्टाग्राम रिल तयार केली आहे, जी चाहत्यांच्या पसंतीला पडत आहे. जडेजाचा हा हटले अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. चाहते जडेजाच्या या रिलवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/CX0u9KvF7Kl/

जडेजाच्या रिलवर चाहत्यांसोबत स्वतः अल्लू अर्जुनने देखील कमेंट केली आहे. अल्लू अर्जुनने या रिलवर तीन इमोजी कमेंट केल्या आहेत. जडेजाने देखील अलू अर्जुनच्या या कमेंटला रिप्लाय दिला आहे. त्यासोबत जडेजाचा भारतीय संघातील सहकारी कुलदीप यादवने देखील खास कमेंट केली आहे.

अधिक वाचा – जडेजा-हिटमॅन आले एकत्र; दक्षिण आफ्रिका दौऱ्याची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ तयारी

यादवने कमेंटमध्ये लिहिले की, “पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहोत”. यावर जडेजाने देखील मजेशीर रिप्लाय दिला. जडेजा रिप्लायमध्ये म्हटला की, होय शुटिंग एनसीएमध्ये होईल.

Ravindra Jadeja Instagram
Photo Courtesy: Instagram/@ravindra_jadeja

दरम्यान, भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. परंतु, न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या दुखापतीतून जडेजा अजूनही सावरला नाही आणि याच कारणास्त तो या दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये दुखापतीवर काम करत आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने देखील दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती, रोहितला मुंबईत सराव करताना पायाला दुखापत झाली होती. सध्या तोदेखील जडेजासोबत एनसीएमध्ये आहे.

महत्वाच्या बातम्या –

विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पाहा वेळापत्रक

“गांगुलीला कर्णधारपदावर बोलण्याचा अधिकार नाही”, दिग्गज भारतीय क्रिकेटर कडाडला

व्हिडिओ पाहा – युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा

युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा |When Yuvraj’s Prank Made Ganguly Cry

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---