भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने शनिवारी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यासाठी हजेरी लावली होती.
या दरम्यान तिच्याशी समालोचकांनी स्टुडिओमधून बातचित केली. यावेळी तिला विचारण्यात आले की आत्ताच्या भारतीय संघातील खेळाडूंपैकी बॅडमिंटन कोर्टवर दुहेरीसाठी तुझा जोडीदार म्हणुन कोणाची निवड करशील?
यावर तिने सांगितले, “मी भारतीय संघातील सर्वोत्तम असणाऱ्या खेळाडूची माझा दुहेरीसाठी जोडीदार म्हणुन निवड करेल. ते सर्व कसे खेळतात हे मला माहिती नाही! तुम्ही एमएस धोनी आणि विराट कोहलीकडून खूप काही शिकू शकता.”
“जरी तुम्ही वेगळा खेळ खेळत असला तरी त्यांच्याकडून बरचं शिकण्यासारखं आहे. त्यांची आक्रमकता आणि ते ज्या प्रकारे खेळतात हे पहाण्यासारखे आहे.”
याबरोबरच सिंधूने सांगितले की ती जेव्हाही हैद्राबादमध्ये असते आणि तिला कोणते सामने नसतात तेव्हा ती सनरायझर्स हैद्राबादचे सामने पहाते.
तसेच ती जेव्हा शक्य होईल तेव्हा सामन्याला हजेरी लावते. याबद्दल ती म्हणाली, “जेव्हा मला बॅडमिंटनचे सामने नसतात आणि मी हैद्राबादमध्ये असते तेव्हा मी क्रिकेटचे सामने पहायला येते. त्याचबरोबर आज शनिवार असल्याने मी इथे क्रिकेटचा आनंद घ्यायला आले आहे.”
क्रिकेटप्रेमीं आहात? आमचे हे रविवारचे भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार हे खास सदर नक्की वाचा-
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर
महत्त्वाच्या बातम्या-
–२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही
–साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल
–टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू
–धोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट!
–राफेल नदालबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?