टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज (१ ऑगस्ट ) भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने इतिहास रचला आहे. सिंधूने चीनची बॅडमिंटनपटू बिंग जियाओला पराभूत करत कांस्यपदक पटकावले आहे. यासह ती सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या विजयाचा आनंद सिंधूपेक्षा तिच्या आई वडिलांना जास्त झाला आहे.
पीव्ही सिंधू हीची आई पी विजया यांनी म्हटले की,”मला खूप आनंद झाला आहे की, माझ्या मुलीने कांस्यपदक पटकावले आहे. सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर, ती खूप दु:खी झाली होती. आम्ही तिच्याशी संवाद साधला आणि तिला धीर देत तिचा उत्साह वाढवला. तिने सुवर्णपदक गमावले परंतु कांस्यपदक देखील आमच्यासाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नव्हे.”(Pv sindhu bronze medal is like gold for us says mother p Vijaya)
वडीलांनी ही केले कौतुक
तसेच पीव्ही सिंधू हिच्या वडीलांनी तिचे कौतुक करत म्हटले की, “आम्हाला सुवर्णपदकाची आशा होती, हे म्हणायला खूप सोपं आहे, परंतु कांस्यपदक देखील खूप मोठी गोष्ट आहे. सिंधू जेव्हाही ऑलिम्पिक खेळण्यासाठी गेली आहे, तेव्हा तिने देशाला पदक मिळवून दिले आहे. जेव्हा ती अंतिम सामन्यासाठी पात्र होऊ शकली नव्हती, तेव्हा ती खूप निराश झाली होती. आम्ही तिची समजूत काढली की, जर तू येणाऱ्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले, तर आणखी चांगले होईल. आता सुशील यांच्या नावे २ ऑलिम्पिक पदक पटकावण्याचा विक्रम आहे. तू देखील असा कारनामा करू शकतेस.” असे सांगून वडिलांनी तिला धीर दिला होता.
तसेच ते पुढे म्हणाले की,”तिचे प्रशिक्षक खूप चांगले आहेत. त्यांनी तिच्यावर खुप मेहनत घेतली आहे. त्यांनी तिला हवं तस खेळण्याची परवानगी दिली आहे. आम्हाला शासनाकडून, भारतीय बॅडमिंटन प्राधिकरणाकडून खूप सहकार्य मिळाले. ती फक्त २६ वर्षांची आहे. जर तिने स्वतःला तंदुरुस्त ठेवले तर कालांतराने तिला भरपूर अनुभव मिळेल.”
नरेंद्र मोदींसोबत खाणार आईस्क्रीम
नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी म्हटले होते की, जर पीव्ही सिंधूने जर पदक पटकावले, तर ते तिच्यासोबत आईस्क्रीम खातील. आता तिने कांस्यपदक पटकावले आहे. याबाबत आपली प्रतिक्रीया देत तिचे वडील म्हणाले, “आता माझी मुलगी नरेंद्र मोदींसोबत आईस्क्रीम खाणार आहे. पीव्ही सिंधूने सिद्ध केला आहे की, मुली मुलांपेक्षा श्रेष्ठ आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘तू भारताची शान आहेस’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २ ऑलिंपिक पदकं जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूचं कौतुक
खुशखबर! १९७२ नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय
भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ; चहल, कुलदीपला दिले नाही स्थान