भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने बुधवारी(१८ ऑगस्ट) सुचित्रा बॅडमिंटन अकादमीमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये जोरदार डान्स केला. ती काहीदिवसांपूर्वीच टोकियोमधून ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारतात परतली आहे.
तिने सपना चौधरीच्या प्रसिद्ध गाणं ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्यावर जोरदार डान्स केला. त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक गाण्यावर देखील जोरदार केला. पीव्ही सिंधू स्टायलिश लूकमध्ये पार्टीमध्ये पोहोचली होती. पीव्ही सिंधूच्या डान्सने पार्टीत आणखी आनंदाची भर पडली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूच्या यशात मेहनतीबरोबरच तिचा संघ देखील महत्त्वाची भूमिका बजावतो आणि सिंधूने त्याच संघातील सदस्यांसाठी पार्टी आयोजित केली होती. पीव्ही सिंधूने अकादमीच्या इतर खेळाडूंसोबत डान्स केला. सर्वांनी बॉलिवूड गाण्यांसह दक्षिणात्य गाण्यांवरही जोरदार डान्स केला. यादरम्यान, हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ गाण्यावरही सर्वांचे पाय थिरकल्याचे दिसले.
https://www.instagram.com/p/CSuJO7mpHZ4/
पीव्ही सिंधूने ऑलिम्पिक पदक जिंकत रचला इतिहास
पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधू सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. पीव्ही सिंधू टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या सामन्यापासून शानदार फॉर्ममध्ये होती, पण उपांत्य फेरीच्या सामन्यात हरल्यानंतर तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, १ ऑगस्ट रोजी पीव्ही सिंधूने कांस्यपदकाच्या लढतीत विजय मिळवत कांस्यपदक जिंकले होते. यापूर्वी तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.
पीव्ही सिंधूची कारकिर्द
आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधूने २००९ मध्ये कोलंबोमध्ये सब-जूनियर आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले होते. २०१० च्या इराण फजर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये सिंधूने एकेरी प्रकारात रौप्य पदक जिंकले. २०१० मध्ये सिंधूने मेक्सिकोमधील ज्युनियर वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासह, २०१० मध्ये ती उबर चषक भारतीय राष्ट्रीय संघाची सदस्यही होती.
साल २०१६ मध्ये सिंधूने रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक जिंकले. यासह, तिला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी प्रथम भारतीय बॅडमिंटनपटू होण्याचा मान मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या –
तालिबानच्या अधिकारानंतरही अफगाणिस्तानचे क्रिकेट सुरक्षित, माजी क्रिकेटपटूचा दावा
आयपीएलमधील संघांना बसणार मोठा धक्का! कमिन्ससह ‘हे’ चार ऑसी खेळाडू दुसऱ्या टप्प्याला मुकणार
‘असली पिक्चर बाकी है’, उर्वरित आयपीएल २०२१ पूर्वी आलेला धोनीचा व्हिडिओ तुुफान व्हायरल