आज(25 ऑगस्ट) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019मध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले आहे.
बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. तिने ओकुहराला 38 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात 21-7, 21-7 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
हे सुवर्णपदक सिंधूने तिच्या आईला समर्पित केले आहे. तिच्या आईचा आज वाढदिवस असल्याने तिने आईला ही वाढदिवसाची खास भेट दिली आहे.
अंतिम सामना जिंकल्यानंतर सिंधू म्हणाली, ‘मी माझे प्रशिक्षक किम जी ह्यून आणि गोपिचंद तसेच सपोर्ट स्टाफ आणि माझ्या पालकांचे यांचे आभार मानते. मी हे पदक माझ्या आईला समर्पित करते. तिचा आज वाढदिवस आहे.’
तसेच सिंधू म्हणाली, ‘मी माझ्या देशासाठी जिंकले आहे आणि मला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे.’
सिंधूचे हे बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधील एकूण 5 वे पदक ठरले आहे. तिने याआधी या स्पर्धेत 2017 आणि 2018 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण तिला दोन्हीवेळेस अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तसेच 2013 आणि 2014 मध्ये तिला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनसाठी ही आहे सर्वात वाईट बातमी!
–बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकत रचला इतिहास
–भारताविरुद्ध तब्बल ९५ मिनिटे फलंदाजी करुनही शून्यावर बाद झाला कमिन्स, केला नकोसा विक्रम