पीव्ही सिंधू ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यफेरीत आज पराभूत झाली. रोमहर्षक सामन्यात तैवानच्या ताई टँझू यिंगने सिंधूवर १०-२१, २२-२०, २१-१६ असा विजय मिळवत उपांत्यफेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत ताई टँझू यिंग पहिल्या क्रमांकावर असून सिंधू तिसऱ्या स्थानी आहे.
पहिल्या सेटमध्ये सिंधू आणि ताई टँझू यिंग ५-५ अशा बरोबरीत होते. त्यांनतर मात्र सिंधूने तिला कुठेही संधी दिली नाही. ११-७, १४-१०, १८-१० अशी कायम आघाडी ठेवत तिने पहिला सेट २१-१० असा जिंकला.
PV Sindhu goes down fighting against Tai Tzu Ying. The World number one wins 10-21, 22-20, 21-16. #AustraliaSS pic.twitter.com/OJNKNxsNEz
— BAI Media (@BAI_Media) June 23, 2017
दुसऱ्या सेटमध्ये मात्र ४-० अशी जबदस्त सुरुवात ताई टँझू यिंगने सिंधूवर जबदस्त दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर पिछाडी भरून काढत ५-५ अशी स्कोर बरोबरी केली. त्यांनतर जबदस्त कमबॅक करत सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली. ताई टँझू यिंगने जबदस्त खेळ दाखवत पुन्हा १८-१४ अशी सिंधूवर आघाडी घेतली. परंतु सलग ५ पॉईंट घेत सिंधूने १९-१८ अशी आघाडी घेतली. तसेच सिंधुकडे मॅच पॉईंट होता. परंतु सिंधूची सर्विस ब्रेक करत ताई टँझू यिंगने पुन्हा २०-२० अशी बरोबरी केली. आणि दुसरा सेट २२-२० असा जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये सिंधूने चांगली सुरुवात करत ४-२ अशी आघाडी घेतली. ही आघाडी वाढवत तिने ८-४ असे गुण केले. परंतु ताई टँझू यिंगने पुन्हा एकदा जबदस्त खेळ करत ८-८ अशी बरोबरी केली. परंतु प्रभावित करणारा खेळ करत सिंधूने आघाडी १४-१० अशी वाढविली. परंतु जागतिक क्रमवारीत पहिल्या असणाऱ्या ताई टँझू यिंगने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत ही आघाडी १५-१५ अशी भरून काढली. त्यांनतर सलग ४ पॉईंट घेत तिने ही आघाडी १९-१५ अशी केली. त्यांनतर सिंधूला विशेष काही खेळ दाखवता न आल्यामुळे ताई टँझू यिंगने २१-१६ असा विजय मिळवत सामना जिंकला.
पुढचा सामना हा साईना नेहवालचा असून बॅडमिंटन चाहत्यांचे त्याकडे आता डोळे लागले आहे.