टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये बॅडमिंटनचा महिला एकेरीच्या अंतिम सामना जगात अव्वल स्थानी असलेली चायनीज तैपेईच्या ताई त्झू-यिंग आणि चीनच्या चेन युफेई यांच्यात रविवारी (1 ऑगस्ट) पार पडला. या अटीतटीच्या लढतीत युफेईने ताईला 21-18, 19-21, 21-18 असे पराभूत करून सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच ताई त्झू यिंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या लढतीनंतर झालेल्या पदक वितरण संमारंभानंतर कांस्यपदक विजेती पीव्ही सिंधूबरोबरील एका भावनिक क्षणाचा खुलासा ताई त्झू-यिंगने केला आहे.
रौप्य पदक मिळाल्यानंतर ताई त्झू-यिंगने इंस्टाग्राम पोस्टवर भावनिक संदेश लिहिला आहे. यात तिने पीव्ही सिंधूबद्दल म्हटले की तिने तिला मिठी मारली आणि तिला सांगितले की तिने अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली.
ताई तीत्झू-यिंगने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले की, “पीव्ही सिंधूने मला मिठी मारली आणि मला सांगितले की मला माहित आहे की तूला ठिक वाटत नाही, पण तू खूप चांगली खेळली आहेस, पण केवळ आज तुझा दिवस नव्हता.” ती पुढे म्हणाली की, “तिने मला मिठीत घेतले आणि म्हणाली की मला हे सर्व माहित आहे. तिचे हे बोलणं ऐकून मला रडू आले.”
https://www.instagram.com/p/CSCdD3_lCrp/
ताई सध्या जगातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटूपैकी एक आहे. परंतु, अजूनही तिने देशाला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिलेले नाही. ती फक्त 27 वर्षांची असूनही तिने या अगोदर असे सांगण्यात आले होते की, ती खेळातून लवकर निवृत्ती घेऊन शकते.
तर दुसरीकडे सिंधू सुशील कुमारनंतर सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकं मिळवणारी दुसरी भारतीय खेळाडू बनली. सिंधूने 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि आता टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. सिंधूने रविवारी कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या हे बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पराभव केला होता.
त्यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत ताई त्झू-यिंगविरुद्ध सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सिंधू अंतिम सामन्यात प्रवेश करु शकली नव्हती. तसेच या सामन्यात पराभूत झाल्याने सिंधूला सुवर्ण आणि रौप्य पदकाच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले होते आणि कांस्यपदकासाठी सामना खेळवा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला समजत नाही की क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी इतके उतावीळ का आहोत?”