---Advertisement---

CWG 2022: पीव्ही सिंधू सलग दुसऱ्यांदा ध्वजवाहक, ओपनिंग सेरेमनीत भारतीय दलाचे करणार नेतृत्त्व

PV-Sindhu
---Advertisement---

भारताची २ वेळची ऑलिंपिक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाची ध्वजवाहक बनवण्यात आले. गुरुवारी (२८ जुलै) होणाऱ्या उद्घाटन समारंभात एकूण १६४ ऍथलिट्स सहभागी होणार आहेत. माजी वर्ल्ड चँपियन सिंधू बर्मिंघममध्ये महिलांच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. गोल्ड कोस्ट आणि ग्लासगो येथे झालेल्या गेल्या दोन हंगामात तिने रौप्य आणि कांस्यपदके जिंकली होती. गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सिंधू ध्वजवाहक होती.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “उद्घाटन समारंभासाठी सिंधूला भारतीय दलाची ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. यापूर्वी ही जबाबदारी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्याकडे देण्यात येणार होती. परंतु वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुखापत झाल्याने तो कॉमनवेल्थ गेम्समधून बाहेर पडला आहे.”

आपल्या दुखापतीविषयी माहिती देताना नीरजने आपल्या सोशल मीडिया हँडलवर म्हटले होते की, “बर्मिंघममध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही याची मला खंत आहे. विशेषत: उद्घाटन समारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक होण्याची संधी न मिळाल्याने मी निराश झालो आहे. गेल्या काही दिवसांत मला सर्व देशवासीयांकडून मिळालेल्या प्रेम आणि आदराबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण अशाचप्रकारे माझ्यासोबत सहभागी होऊन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या देशातील सर्व खेळाडूंना पाठिंबा देत राहाल. जय हिंद.”

दरम्यान सिंधूने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपन हे दोन सुपर ३०० विजेतेपद पटकावले आहेत. अशात ती कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्येही विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

SCOvNZ: ऍलनचा शतकी तडाखा आणि सोढीच्या फिरकीपुढे स्कॉटलंड नतमस्तक

टी२० क्रिकेटमध्ये घडला अद्वितीय पराक्रम, एकाच दिवशी ३ फलंदाजांनी ठोकली शतके

धवन-गिल जोमात, वेस्ट इंडिज कोमात! तिन्ही वनडेत कॅरेबियन्सना फुल नडले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---