पुणे : इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत २२ यार्ड्स, पीवायसी, जिल्हा संघांनी विजय साकारला.
डीव्हीसीए मैदानावर झालेल्या लढतीत २२ यार्ड संघाने डीव्हीसीए संघाला ६ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना डीव्हीसीए संघाला १०.१ षटकांत सर्वबाद ३१ धावाच करता आल्या. हर्षवर्धन पाटील व अथर्व शिंदे यांनी भेदक गोलंदाजी अनुक्रमे ६ व ४ गडी बाद केले. २२ यार्ड संघाने ८.१ षटकांत हे आव्हान ४ गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करताना विजय साकारला. डीव्हीसीएच्या तिलक जाधवने ३ तर हर्षवर्धन पवारने १ गडी बाद करताना चांगली लढत दिली. २२ यार्ड्सच्या हर्षवर्धन पाटील याला सामनावीर जाहीर करण्यात आले.
पीवायसी मैदानावर झालेल्या लढतीत पीवायसी संघाने मेट्रो संघाला ६ गडी राखून पराभूत केले. मेट्रो संघाने निर्धारित ५० षटकांत ९ बाद २३३ धावा केल्या. नित्याय लुंकड (५४), यश बर्गे व शशिकांत पवार (३८) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ही धावसंख्या उभारली. स्वराज चव्हाण याने ४ गडी बाद करताना भेदक गोलंदाजी केली. पीवायसी संघाने हे आव्हान ४६.५ षटकांत ४ गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सोहम शिंदे (९२), यतीन कार्लेकर ४१, रिषभ रानडे ३६ यांनी आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या लढतीत स्वराज चव्हाण सामनावीर ठरला.
डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या लढतीत जिल्हा संघाने डेक्कन जिमखाना संघाला ७९ धावांनी पराभूत केले. जिल्हा संघाने निर्धारित ५० षटकांत २५७ धावा केल्या. अभिषेक पवार (६४), सौरभ शिंदे (४७) देव नवले (३९) यांनी संघाला ही धावसंख्या उभारून दिली. सौरभ शिंदे यांच्या भेदक गोलंदाजी समोर डेक्कन जिमखाना संघ ४६.२ षटकांत सर्व बाद १७८ एवढीच धावसंख्या करू शकला. सौरभने ६ गडी बाद करताना संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक : डीव्हीसीए : १०.१ षटकांत सर्वबाद ३१ ( तिलक जाधव १०, १ चौकार, अंश धूत ४, १ चौकार, हर्षवर्धन पाटील ५-१-१२-६, अथर्व शिंदे ५-१-१७-४) पराभूत वि २२ यार्ड : ८.१ षटकांत ४ बाद ३४ (तेजस तोळसनकर १३, ३ चौकार, गौरव कुमकर ८, १ चौकार, तिलक जाधव ४-१-१३-३, हर्षवर्धन पवार ४.१-०-१८-१) सामनावीर : हर्षवर्धन पाटील, २२ यार्ड
मेट्रो क्रिकेट क्लब : ५० षटकांत ९ बाद २३३ (नित्याय लुंकड ५४,७ चौकार, १ षटकार, यश बर्गे ३८, ४ चौकार, २ षटकार, शशिकांत पवार ३८,४ चौकार, १ षटकार, सार्थक वाळके २१, २ चौकार, स्वराज चव्हाण ७-०-५३-४, यश खळदकर १०-१-३४-२, अब्दुस सलाम ९-२-४२-२) पराभूत वि पीवायसी ४६.२ षटकांत ४ बाद २३४ (सोहम शिंदे ९२, १३ चौकार, २ षटकार, यतीन कार्लेकर ४१, ५ चौकार, रिषभ रानडे ३६, ४ चौकार, १ षटकार, स्वप्नील शिंदे ३०, ४ चौकार, सार्थक वाळके १०-२-२६-२, मिर्जा बेग ७-१-४१-१, नीरज जोशी १०-०-३७-१) सामनावीर : स्वराज चव्हाण, पीवायसी.
जिल्हा संघ : ५० षटकांत सर्व बाद २५७ (अभिषेक पवार, ६४, ७ चौकार, २ षटकार, सौरभ शिंदे ४७, ७ चौकार, देव नवले ३९, ५ चौकार, किरण चोरमाले ३३, ३ चौकार, अजय बोरूडे १०-०-४२-४, रुद्रज घोसाळे १०-०-५१-३, अथर्व वणवे ४-०-२६-१) वि वि डेक्कन जिमखाना : ४६.२ षटकांत सर्व बाद १७८ (अजय बोरूडे ६५, ६ चौकार, ३ षटकार, क्रिश शहापूरकर ४५, ६ चौकार, सौरभ शिंदे ९.२-१-३१-६, किरण चोरमाले ७-०-३१-२, ओंकार पटकल ७-०-३८-१) सामनावीर : सौरभ शिंदे, जिल्हा संघ.