पुणे, 17 डिसेंबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत अंतिम फेरीत हर्षा जैन (नाबाद 52धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर लायन्स संघाने जीएम टायफून्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना जीएम टायफून्स संघाने 6 षटकात 4बाद 71 धावा केल्या. यात अश्विन शहाने 16चेंडूत 2चौकार व 3 षटकाराच्या मदतीने 33धावा, तर निखिल कानिटकर 19 धावा केल्या. लायन्सकडून मोनिश गोखले(1-8), असीम देवगांवकर(1-4) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हे आव्हान लायन्स संघाने 5.3 षटकात 1बाद 75धावा करून पुर्ण केले. यात हर्षा जैनने 18चेंडूत 7 षटकारासह नाबाद 52 धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला ईशांत रेगेने 11धावा ,मोनीश गोखलेने नाबाद 7 यांनी धावा काढून साथ दिली. सामनावीर हर्षा जैन ठरला.
स्पर्धेतील विजेत्या लायन्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष श्री कुमार ताम्हाणे, क्लबचे सचिव श्री सारंग लागू, पुसाळकर ग्रुपचे रोहन पुसाळकर, क्लबचे क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी होडेकचे अभिजीत खानविलकर, बेलवलकर हाउसिंग लिमिटेडचे समीर बेलवलकर, चाफळकर करंदीकर डेव्हलपर्सचे श्रीनिवास चाफळकर, सुजनीलचे आशिष देसाई, सुप्रीम इंफ्राचे आमीर आजगांवकर, नेव्हीटास जेनसेटचे वेंकटेश कशेळीकर, अभिषेक ताम्हाणे, मंदार देवगावकर, शिरीष साठे, सिद्धार्थ भावे, नंदन डोंगरे, शिरीष आपटे, सिद्धार्थ दाते आदी मान्यवर उपस्थित होते. महेंद्र गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
निकाल: अंतिम फेरी:
जीएम टायफून्स: 6 षटकात 4बाद 71 धावा(अश्विन शहा 33(16,2×4,3×6), निखिल कानिटकर 19(8,3×6), मोनिश गोखले 1-8, असीम देवगांवकर 1-4) पराभुत वि.लायन्स: 5.3 षटकात 1बाद 75धावा (हर्षा जैन नाबाद 52(18,7×6), ईशांत रेगे 11(8,1×4), मोनीश गोखले नाबाद 7, क्रिश शहा 1-5); सामनावीर – हर्षा जैन; लायन्स संघ 7 गडी राखून विजयी.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: इशांत रेगे (320धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: तन्मय चोभे(6विकेट);
मालिकावीर: रणजीत पांडे (256धावा, 5विकेट);
बेस्ट व्हॅल्यूएबल सिनियर खेळाडू: अनिल छाजेड;
बेस्ट व्हॅल्यूएबल ज्युनियर खेळाडू: असीम देवगांवकर;
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: देव शेवाळे;
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: आशुतोष शहा;
बेस्ट फिल्डर फायनल मॅच: मोनिश गोखले.
महत्वाच्या बातम्या –
SA vs IND । ‘…तर आनंदच होईल’, कसोटी मालिकेपूर्वी केएल राहुलने व्यक्त केली इच्छा
IPL 2024 । मुंबई इंडियन्ससह ‘हे’ चार संघांचे कर्णधार बदलणार, पाहा सर्व 10 कर्णधारांची यादी