---Advertisement---

MSLTA PMDTA AITA: स्मित उंद्रे, पंचुल उबवेजा यांच्यासह आणखी दोघे मुख्य फेरीत दाखल

On: मंगळवार, एप्रिल 14, 2026 7:36 PM
---Advertisement---

पॉल प्रो टेनिस अकादमी यांच्या वतीने व ब्लेझ ऑलिंपिया यांच्या सहकार्याने आयोजित एमएसएलटीए पीएमडीटीए एआयटीए अखिल भारतीय मानांकन 1लाख पारितोषिक रकमेची टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्मित उंद्रे, पंचुल उबवेजा,शार्दूल खवले, मनन अग्रवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. 
सुस रोड येथील सनी वर्ल्ड टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत पुरुष गटात बिगर मानांकित 

पंचुल उबवेजा याने अव्वल मानांकित प्रणव मिश्राचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. संघर्षपूर्ण लढतीत शार्दुल खवलेने अंशुल पुजारीचा टायब्रेकमध्ये 6-3, 6-7(6), 10-6 असा पराभव केला. नवव्या मानांकित मनन अग्रवाल याने वीरेन सुर्यवंशीचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. स्मित उंद्रे याने चिन्मय ठाकरेचा 6-2, 6-2 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.

कर्नाटकच्या तेराव्या मानांकित अर्जुन प्रेमकुमार याने महाराष्ट्राच्या नीरज जोर्वेकरला 6-2, 7-6(2) असे पराभूत केले. दहाव्या मानांकित प्रज्वल तिवारीने तामिळनाडूच्या गौथम व्यंकटेशचा 6-0, 6-0 असा सहज पराभव केला. स्पर्धेतील मुख्य ड्रॉ मधील खेळाडूंची मानांकन यादी आज जाहीर करण्यात आली. मध्यप्रदेशच्या  मुनीम दीप याला अव्वल मानांकन देण्यात आले. तर, महाराष्ट्राच्या संदेश कुरळे याला दुसरे आणि तेलंगणाच्या सुहित रेड्डी लंके याला तिसरे मानांकन देण्यात आले. 

निकाल: अंतिम पात्रता फेरी:
पुरुष:
पंचुल उबवेजा (महाराष्ट्र) वि.वि.प्रणव मिश्रा (1) 6-0, 6-0.
अर्जुन प्रेमकुमार (13)(कर्नाटक) वि.वि.नीरज जोर्वेकर (महाराष्ट्र)6-2, 7-6(2).
शार्दुल खवले (महाराष्ट्र) वि.वि.अंशुल पुजारी (महाराष्ट्र) 6-3, 6-7(6), 10-6.
मनन अग्रवाल (9) (महाराष्ट्र) वि.वि.वीरेन सुर्यवंशी(महाराष्ट्र) 6-2, 6-3.
स्मित उंद्रे (महाराष्ट्र)वि.वि.चिन्मय ठाकरे (महाराष्ट्र) 6-2, 6-2.
प्रज्वल तिवारी (10) वि.वि.गौथम व्यंकटेश (तामिळनाडू) 6-0, 6-0. 

एकेरीतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे-
1. मुनीम दीप (मध्यप्रदेश)
2. संदेश कुरळे(महाराष्ट्र)
3. सुहित लंके(तेलंगणा)
4. प्रसाद इंगळे(महाराष्ट्र)
5. अजमीर शेख (महाराष्ट्र)
6. मनदीप कुदुमला (कर्नाटक)
7. नीरव शेट्टी (महाराष्ट्र)
8. तनिष्क जाधव (महाराष्ट्र)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---