---Advertisement---

चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 मध्ये एएसआर डॉल्फिन्स संघाला सलग दुसरे विजेतेपद 

On: मंगळवार, एप्रिल 14, 2026 7:20 PM
---Advertisement---

पूना क्लब यांच्या वतीने आयोजित चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत गतविजेत्या एएसआर डॉल्फिन्स संघाने अव्वल स्थान पटकावत विजेतेपद संपादन केले.

पूना क्लब स्विमिंग पूल या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत सेरेना फिलानी, झायन इराणी, येवा रोपलेकर, अर्णव नंदा, विहान तुळपुळे, तैझुन बेकर, अवंतिका जिंदाल, अन्वया जोशी, अवीर सिंग, प्रीती मराठे, माधव क्षीरसागर यांच्या विजयी कामगिरी जोरदार एएसआर डॉल्फिन्स संघाने 119 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला.  

एसके फ्लिपर्स संघाने 99 गुणांसह उपविजेतेपद, तर जेट्स संघाने  95 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी वेंकीज, व्हेनकॉब व एनईसीसी हे मुख्य प्रायोजक आहेत. 

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लबचे अध्यक्ष व स्विमिंग विभागाचे सचिव गौरव गढोक, पूना क्लबच्या क्रीडा विभागाचे चेअरमन तुषार आसवानी आणि प्रायोजक व्हेनकॉबचे अमित रोपलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---