---Advertisement---

विराटच्या करियरवर उपस्थित होऊ लागले प्रश्नचिन्ह, मागच्या 18 पैकी 14 सामन्यांमधून माघार

On: शुक्रवार, फेब्रुवारी 9, 2024 12:24 PM
Virat-Kohli-SEMI
---Advertisement---

सध्या क्रिकेटविश्वात विराट कोहली चर्चेचा विषय बनला आहे. विराट मागच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळला नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. आता पुढच्या दोन कसोटींमधून देखील माजी कर्णधार माघार घेण्याच्या तयारीत दिसत आहे. मागच्या चार महिन्यांमध्ये विराट कोहलीने खूपच कमी क्रिकेट खेळल्याचे एकंदरीत पाहता दिसते.

विराट कोहली भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे दिग्गज फलंदाज आहे. इंग्लंडसारखा बलाढ्य संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका कोणत्याही खेळाडूसाठी महत्वाची आहे. पण विराट वैयक्तिक कारणास्तव या मालिकेत खेळत नाहीये. माध्यमांतील वृत्तांनुसार पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतल्यानंतर पुढच्या दोन कसोटी सामन्यांसाठी दिग्गज फलंदाज उपलब्ध नसेल. पण अद्याप याविषयी कुठली अधिकृत माहिती समोर आली नाहीये. उभय संघांतील कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीवर आहे.

मागच्या चार महिन्यांमध्ये विराट कोहली भारतीय संघाकडून अवघ्या 4 सामन्यांचा भाग बनला. वनडे विश्वचषक संपल्यानंतर विराट सतत संघातून बाहेर राहिला आहे. यादरम्यान खेळल्या गेलेल्या 18 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 14 सामन्यांसाठी तो उपलब्ध नव्हता. विश्वचषक संपल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौरा केला. याठिकाणी तीन वनडे, तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळल्या गेल्या. त्यानंतर बारतीय संघाने मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळली. सध्या संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यादरम्यान, विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, आणि अफागणिस्तानविरुद्ध दोन टी-20 सामने खेळले.

दरम्यान, यावर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर विराट आणि रोहित शर्मा यांनी टी-20आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन देखील केले. 2022 टी-20 विश्वचषकात मिळालेल्या पराभवानंतर या दोघांनी एका वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. पण आगमी टी-20 विश्वचषकासह पुन्हा क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटकडे मोर्चा वळवला आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी विराटसह सर्वांना इंडियन प्रीमियर लीग खेळायची आहे. पण त्याचसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील सक्रिय सहभाग गरजेचा आहे.

विराट खेळण्यासाठी अनुपलब्ध असल्याने वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या आहेत. विराटच्या आईची तब्येत बिघडल्याने त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली, असे सांगितले जात होते. पण विराटचा भाऊ विकास कोहली याने या बातम्या चुकीच्या असल्याचे सोशल मीडियावरून स्पष्ट केले. त्याचसोबत माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधार आणि विराटचा चांगला मित्र एबी डिविलियर्स यानेही महत्वाचे संकेत दिले. डिविलियर्स काही दिवसांपूर्वी असे म्हटला होता की, विराट दुसऱ्यांदा वडील होणार आहे, ज्यामुळे तो कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. असे असले तरी, या विधानाची जोरदार चर्चा झाल्यानंतर डिविलियर्सने आपल्याकडून चूक झाली असे म्हटले. डिलियर्सच्या मते विराटविषयी त्याने दिलेली माहिती बरोबर नव्हती.

महत्वाच्या बातम्या – 
वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’
U19 World Cup Final: ठरलं! वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हां एकदा भारत ऑस्ट्रलिया वर्ल्डकप फायनल सामना…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---