---Advertisement---

फलंदाजी करतोय की झाडू मारतोय? शादाब खानच्या गोलंदाजीवर आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाद झाला फलंदाज – व्हिडिओ

On: शुक्रवार, फेब्रुवारी 4, 2022 4:46 PM
shadab khan bowling
---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीग २०२२ (Pakistan super league 2022)  स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत गुरुवारी (३ फेब्रुवारी ) झालेल्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) आणि क्वेटा ग्लॅडीएटर्स (Quetta gladiators)   हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाला ४३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यात शादाब खानच्या (Shadab Khan)  गोलंदाजीवर फलंदाज आगळ्या वेगळ्या पद्धतीने बा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड संघाला विजय मिळवून देण्यात शादाब खानने मोलाची भूमिका बजावली होती. शादाब खानने ४ षटक गोलंदाजी केली ज्यामध्ये त्याने २८ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. त्याने एहसान अली, सरफराज अहमद, बेन डकेट, इफ्तिखार अहमद आणि शाहीद आफ्रिदी सारख्या फलंदाजांना बाद केले. या दरम्यान बेन डकेटला बाद केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

तर झाले असे की, इस्लामाबाद युनायटेड संघाची गोलंदाजी सुरू असताना १० वे षटक टाकण्यासाठी शादाब खान गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाने आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला पाहून असे वाटत होते की, तो खेळपट्टीवर झाडू मारत आहे. फलंदाज शॉट खेळणार इतक्यात चेंडू यष्टीला जाऊन धडकला. डकेटने या डावात ११ धावांचे योगदान दिले.

https://www.instagram.com/tv/CZhfdl5q9N8/?utm_source=ig_web_button_share_sheet

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.इस्लामाबाद युनायटेड संघाकडून कॉलिन मुनरोने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर आजम खानने ६५ धावा केल्या होत्या. या डावात क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाकडून शाहिद आफ्रिदीने सर्वाधिक ६७ धावा खर्च केल्या होत्या. २० षटक अखेर इस्लामाबाद युनायटेड संघाला ४ बाद २२९ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाकडून एहसान अलीने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर मोहम्मद नवाजने ४७ धावांचे योगदान दिले होते. दरम्यान क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाचा डाव १८६ धावांवर संपुष्टात आला होता.

महत्वाच्या बातम्या :

कशी आहे रोहितच्या नेतृत्त्वाची शैली? भारताच्या ३१ वर्षीय गोलंदाजाने केला उलगडा

ईसीबीचा मोठा निर्णय! ऍशेस गमावल्याने ‘त्या’ व्यक्तीची केली हकालपट्टी

‘बेबी एबी’चा कहर! १९ वर्षांखालील विश्वचषकात ५०० हून अधिक धावा चोपत मोडला शिखरचा १८ वर्षे जुना विश्वविक्रम

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---