---Advertisement---

निवृत्तीनंतर फावल्या वेळेत क्विंटन डी कॉक जपतोय आपला छंद, मासे पकडतानाचा फोटो केला शेअर

On: सोमवार, जानेवारी 3, 2022 3:56 PM
Quinton-De-Kock
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक(Quinton De Kock)ने 2021 वर्षाच्या सांगतालाच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर तो कुटुंबासोबत आपला वेळ घालवताना दिसत आहे. यादरम्यान तो आपला छंदही जोपासताना दिसतो आहे. डी कॉक समुद्रात मासेमारी करताना (Quinton De Kock Catches Fish) दिसला आहे. डी कॉकची पत्नी साशाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा मासे पकडतानाचा फोटो शेअर केला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. जी संघातील आणि त्यांच्या चाहत्यांच्या ही मनाला पोकरणारी होती. 29 वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने अचानक निवृत्ती जाहीर केली होती. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. आता तोही तेच करताना दिसत आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला डी कॉक आपल्या कुटुंबासोबत खूप मस्ती करताना दिसला. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये डी कॉक मासेमारी करताना दिसला. त्याची पत्नी साशाने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने त्याच्या पोस्टमध्ये डी कॉकचा फोटो जोडला आहे. यामध्ये डी कॉक मासेमारी करताना दिसत होता. फोटोमध्ये डी कॉकच्या हातात एक मोठा मासाही दिसत होता. फोटोत पाहिल्यावर हा मासा निसना लगून माशासारखा दिसत आहे.

 

डी कॉकने आपल्या वक्तव्यात काय म्हटले आहे?
“मला माझ्या लोकांसोबत वेळ घालवायचा आहे. मला कसोटी क्रिकेट आवडते. मलाही माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करायला आवडते. मी चढ-उतार, उत्सव आणि अगदी निराशेचा आनंद घेतला आहे, परंतु आता मला काहीतरी सापडले आहे जे मला अधिक आवडते. तुम्ही वेळ सोडून आयुष्यातील जवळपास सर्व काही विकत घेऊ शकता आणि सध्या माझ्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या लोकांना वेळ देण्याचा कालावधी आला आहे.”

डी कॉकचा कसोटी प्रवास
डी कॉकने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने एकूण 54 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 38.82 च्या सरासरीने 3300 धावा केल्या आहेत. यामध्ये सहा शतकांचा समावेश आहे. त्याचे पहिले शतक सेंच्युरियनच्या त्याच मैदानावर (सुपर स्पोर्ट्स) झाले, जिथे त्याने शेवटची कसोटी खेळली.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतल्यानंतर ट्वीटरवर आला प्रतिक्रियांचा पूर; चाहते म्हणतायेत…

कसोटीच्या नेतृत्त्वाची सूत्रे हाती घेत राहुलच्या शिरपेचात मानाचा तुरा, असा करणारा बनला चौथा कानडी क्रिकेटर

RSA v IND 2nd Test Live: टीम इंडियाला सलग २ धक्के, पुजारापाठोपाठ रहाणे शून्यावर बाद; भारताच्या ३ बाद ४९ धावा

हेही पाहा-

बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही... | What is Boxing Day Test? History of Boxing Day

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---