आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाचा विचार केल्यास भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी, श्रीलंकेचा कुमार संगकारा, ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट हे खेळाडू महान आहेत. यष्टीरक्षणाशिवाय हे सर्व खेळाडू फलंदाज म्हणूनही दिग्गज मानले जातात. या सर्वांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षणाशिवाय फलंदाजीत दहा हजारपेक्षा अधिक धावा बनविल्या आहेत. आता या दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक याचेदेखील नाव जमा झाले आहे.
आयर्लंडविरूद्ध ठोकले दमदार शतक
दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात डब्लिन (मलाहायडे) मधील वनडे मालिकेच्या तिसर्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या दोन्ही सलामीवीरांची दमदार शतके ठोकली. जानेमन मलानने १७७ धावांची खेळी केली. दुसरीकडे माजी कर्णधार व अनुभवी यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने केवळ ९१ चेंडूत ५ षटकार आणि ११ चौकार लगावत १२० धावांची खेळी केली. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील १६ वे शतक ठरले.
दिग्गजांमध्ये झाला समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावा बनविणारा सातवा यष्टीरक्षक-फलंदाज होण्याचा मान डी कॉकने मिळवला. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा यष्टीरक्षक आहे. यापूर्वी अशी कामगिरी दक्षिण आफ्रिकेसाठी मार्क बाऊचर याने केले होती. या यादीमध्ये श्रीलंकेचा कुमार संगकारा, भारताचा एमएस धोनी, ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट, बांगलादेशचा मुशफिकुर रहिम व झिम्बाब्वेचा ऍण्डी फ्लॉवर यांचा समावेश आहे.
अशी राहिली आहे कारकीर्द
सन २०१३ पासून दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे प्रतिनिधित्व करत असलेल्या डी कॉकने ५३ कसोटी व १२४ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये तो अनुक्रमे ३२४५ व ५३५५ धावा काढण्यात यशस्वी ठरला. तसेच, ५२ टी२० सामन्या त्याच्या नावे १५५८ धावा जमा आहेत. तसेच त्याने काही काळ दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व देखील केले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारे यष्टीरक्षक
कुमार संगकारा – १७,८४०
एमएस धोनी – १७,२६६
ऍडम गिलख्रिस्ट – १५,२५२
मुशफिकुर रहिम – १०,७७९
मार्क बाऊचर – १०,४६३
ऍण्डी फ्लॉवर – १०,२४९
क्विंटन डी कॉक – १०, ०९२
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीजचा ‘हा’ सलामीवीर बनला टी२०तील ‘नवा सिक्सर किंग’, फिंच-गेलही त्याच्यापुढे फेल
ENGvPAK: पहिल्या टी२०त इंग्लंडच्या फलंदाजाचे झंझावती शतक, विक्रमांची लावली रांग
चित्यासारखी चपळता.. हवेत सुरेख डाईव्ह.. ब्राउंडीवर फॅबियन ऍलेनचा अविश्वसनीय झेल; एकदा पाहाच