भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना इंदोर येथे खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात शानदार फलंदाजी करत भारतीय संघासमोर मोठे लक्ष ठेवले. संघाचा अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉकने झंझावाती फलंदाजी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले.
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संघाचा कर्णधार टेंबा बवुमा पुन्हा एकदा अपयशी ठरला व केवळ तीन धावा करून माघारी परतला. मात्र, मागील सामन्यात 69 धावा करत फॉर्ममध्ये परतलेल्या डी कॉकने कोणतेही दडपण न घेता भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने भारतीय फलंदाजांचा पुरता घाम काढत 43 चेंडूवर 68 धावांची खेळी केली. यामध्ये 6 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता.
या खेळी दरम्यान तो दक्षिण आफ्रिकेसाठी टी20 मध्ये 2000 धावा बनवणारा दुसरा फलंदाज बनला. त्याने मागील सामन्यातच 2000 धावांचा टप्पा पार केलेल्या डेव्हिड मिलर याला मागे टाकले. सोबतच दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा देखील बनवल्या.
डी कॉक आता वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनसह भारताविरुद्ध सर्वाधिक 4 टी20 अर्धशतके बनवणारा फलंदाज बनला आहे. तसेच भारताविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त धावा बनवणारा तो पहिला फलंदाज बनला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या टी-20त भारतीय संघात होऊ शकतात हे महत्वाचे बदल! पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन
आता वर्ल्डकपमध्ये भारताचं काही खरं नाय! दिग्गजच म्हणालाय, ‘टीम इंडियात बुमराहसारखा कुणीच नाही’