दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ब्लोएमफातेन येथे खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत 392 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉक याने वेगवान सुरुवात दिली. यादरम्यान त्याने वनडे क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला.
ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नर व मार्नस लॅब्युशेन यांनी शतके केल्यानंतर संघाने 392 अशी मोठी धावसंख्या उभी केली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार टेंबा बवुमा व डी कॉक यांनी जोरदार सुरुवात करून दिले. सहाव्या षटकात दक्षिण आफ्रिकेने 50 धावांचा टप्पा पार केला. दहाव्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने केवळ 30 चेंडूंमध्ये 45 धावा कुटल्या. यामध्ये सहा चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.
वनडे क्रिकेटमध्ये सहा हजार धावा पूर्ण करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा सातवा फलंदाज ठरला. हाशिम आमलानंतर सर्वात कमी डावांमध्ये त्याने हा टप्पा पार केला. डी कॉकने 142 व्या डावात ही कामगिरी केली. आमलाने 130 डावात 6000 धावा पूर्ण केल्या होत्या. या व्यतिरिक्त एबी डीव्हीलियर्स, ग्रॅमी स्मिथ, जॅक कॅलिस, हर्षल गिब्स व गॅरी कर्स्टन यांनी देखील दक्षिण आफ्रिकेसाठी ही कामगिरी करून दाखवली आहे.
(Quinton de Kock Complete 6000 Runs In ODI)
महत्वाच्या बातम्या –
वनडेत वॉर्नरकडून मैलाचा दगड पार! आफ्रिकन गोलंदाजांना चोपत बनवला नवा विक्रम
वॉर्नरचा द. आफ्रिकेला शतकी तडाखा! सचिनला पछाडत बनला नंबर वन