दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) संघात शुक्रवारी (२१ जानेवारी) वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. पर्लच्या बोलँड पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ बाद २८७ धावा केल्या. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने सर्वाधिक ८५ धावा फटकावत सर्वांचे लक्ष वेधले. रिषभप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) हादेखील सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. पण त्याने यष्टीपुढे नसून यष्टीपाठी केलेल्या पराक्रमाने (Quinton De Kock Stumping) सर्वांची वाहवा लुटली आहे.
त्याचे झाले असे की, भारताच्या डावातील ४४ वे षटक टाकण्यासाठी दक्षिण आफ्रिकी गोलंदाज अँडिले फेहलुकवायो आला होता. त्याने षटकातील पाचवा लेग साईडला चेंडू अतिशय वेगाने टाकला. ज्यावर काही कळायच्या आत फलंदाजी करत असलेला अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venktesh Iyer) यष्टीचीत झाला. अय्यरने त्या चेंडूला हिट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला काही समजायच्या आत चेंडू यष्टीमागे असलेल्या डी कॉकच्या हातात गेला आणि त्याने विजेच्या वेगाने त्याच्या यष्ट्या उडवल्या.
हा सर्व प्रकार इतक्या वेगाने घडला की, अगदी मैदानी पंचांनाही कधी विकेट गेली हे समजले नाही. शेवटी त्यांना टिव्ही पंचांची मदत घेत हा निर्णय द्यावा लागला. त्याच्या या यष्टीरक्षणाने सर्वांना एमएस धोनी (MS Dhoni)ची आठवण झाली असावी.
Quinton de Kock – The new king of the leg-side stumping 👏
For the second time in this series, he completes a leg-side stumping off Andile Phehlukwayo’s bowling. Those hand! 🔥
📺 Stream #SAvIND live: https://t.co/0BMWdeEYT3 pic.twitter.com/NpjWQdSHzd
— SuperSport 🏆 (@SuperSportTV) January 21, 2022
https://twitter.com/addicric/status/1484500807513174026?s=20
पंतला अशाच प्रकारे केले होते यष्टीचीत
तत्पूर्वी पहिल्या वनडेतही डी कॉकने अशाच प्रकारे भारताच्या पंतला बाद केले होते. रिषभ पंत फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिका संघाकडून ३५ वे षटक टाकण्यासाठी फेहलुक्वायो गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने लेग साईडच्या दिशेने टाकला, ज्यावर रिषभ पंतने लेग साईडच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.
परंतु, पंतचा हा प्रयत्न हुकला आणि चेंडू यष्टिरक्षक करत असलेल्या क्विंटन डी कॉकच्या हातात गेला. त्याने क्षणभरही वेळ न दवडता, वाऱ्याच्या वेगाने रिषभ पंतला यष्टीचीत केले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
तसेच सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताला ५० षटकात २८७ धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले होते. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली होती. तर कर्णधार केएल राहुलनेही या सामन्यात अर्धशतक ठोकले. तो ५५ धावांवर बाद झाला. याखेरीज शार्दुल ठाकूरने शेवटी फलंदाजीला येत पुन्हा नाबाद ४५ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘झिरो’मुळे विराटचा सोशल मीडियावर होतोय बाजार, मीम्स व्हायरल करत चाहते साधतायत निशाणा
Video: अंपायरिंग सोपी नसते!! फलंदाजाच्या त्या शॉटमुळे पंचांची उडाली दाणादाण, मग झाले असे काही
हेही पाहा-