जोहान्सबर्ग। पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका सुरु असून रविवारी (४ एप्रिल) दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने ३४१ धावांचा डोंगर उभा केला. या डावादरम्यान एक मजेशीर घटनाही घडली. क्विंटन डीकॉक फलंदाजी करत असताना स्टंपला चेंडू लागूनही तो बाद झाला नाही.
दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार तेंबा बाऊमाने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तसेच यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डी कॉकने ८६ चेंडूत ८० धावांची खेळी केली. याशिवाय रस्सी वॅन डर दसन (६०) आणि डेव्हिड मिलर(५०) यांनीही अर्धशतके केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३४१ धावांचा डोंगर उभा केला.
बाद होता होता वाचला डी कॉक
डी कॉकला ८० धावांच्या खेळीदरम्यान एकदा जीवनदानही मिळाले होते. झाले असे की दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या २४ व्या षटकात शादाब खान गोलंदाजी करत होता. त्यावेळी या षटकातील चौथ्या चेंडूवर डीकॉकने पॅडल स्वीपचा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला हा शॉट नीट खेळता आला नाही. त्यामुळे चेंडू स्टंपच्या दिशेने गेला. यावेळी चेंडूने स्टंपला स्पर्श केला, मात्र स्टंपवरील बेल्स खाली पडल्याच नाहीत. त्यामुळे डीकॉक बाद होता होता थोडक्यात वाचला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
https://twitter.com/tony49901400/status/1378649760236589057
यापूर्वीही घडल्या आहेत अशा घडना
क्रिकेटमध्ये चेंडू स्टंपला लागल्यानंतरही बेल्स न पडण्याची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वीही २०१९ विश्वचषकात आणि २०१९ आयपीएल हंगामातही अशा घटना अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉने एकत्र बसून घेतली होती २०११ विश्वचषक फायनलची मजा, फोटो होतोय व्हायरल
आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ धुरंधराची बहीण आहे सौंदर्याची खाण; तिच्यापुढे अनुष्का-नताशाही पडतील फिक्या!






