दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने विस्फोटक फलंदाज क्विंटन डी कॉकच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वनडे आणि टी२० संघाच्या नेतृत्त्वाची कमान सांभाळत असलेला हा खेळाडू आता कसोटी संघाचेही नेतृत्त्व करणार आहे. शुक्रवारी (११ डिसेंबर) क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने याविषयी माहिती दिली आहे. त्याच्यापुर्वी दक्षिण आफ्रिकाचा अनुभवी खेळाडू फाफ डू प्लेसिस हा कसोटी संघाचा कर्णधार होता.
येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ श्रीलंकाविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच २०२०-२१ हंगामात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे. या तिन्ही मालिकेत डी कॉक दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल.
याविषयी बोलताना दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य निवडकर्ता व्हिक्टर पिटसेंग यांनी डी कॉकच्या क्षमतेवर त्यांना विश्वास असल्याचे सांगितले. “राष्ट्रीय निवड समितीद्वारे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आम्ही संतुष्ट आहोत. याद्वारे आम्ही संघात सातत्य राखून ठेवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. डी कॉक पुढील हंगामापर्यंत ही जबाबदारी पार पाडण्यास सज्ज आहे. आम्हाला त्याच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास आहे,” असे बोलताना पिटसेंग म्हणाले.
Quinton de Kock will captain your #Proteas as the squad prepares to take on @OfficialSLC in the #BetwayTest Series.
3 maiden call-ups include Glenton Stuurman, Sarel Erwee and Kyle Verreynne.
Rabada and Pretorius remain out of action due to injury#SAvSL #SeeUsOnThePitch pic.twitter.com/BDdL6RfsvW
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 11, 2020
बॉक्सिंग डे कसोटीने होणार सुरुवात
श्रीलंका व दक्षिण आफ्रिका संघातील कसोटी मालिकेची सुरुवात २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याने होणार आहे. तसेच दुसरा व अंतिम कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान जोहान्सबर्गमध्ये होणार आहे.
असा आहे दक्षिण आफ्रिका संघ
क्विंटन डी कॉक (कर्णधार व यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा, एडिन मार्कराम, फाफ डू प्लेसिस, बेयुरान हैंड्रिक्स, डीन एल्गर, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, रासी वान डर डुसैन, सारेल इर्वी, एनरिक नोर्टजे, ग्लेंटन स्टुरमैन, वियान मल्डर, कीगन पीटरसन, काइल वेरीयेने
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! हा संघ करणार दक्षिण अफ्रिकेचा दौरा, ‘बॉक्सिंग डे’ कसोटीने होणार दौऱ्याला सुरुवात
“कसोटी मालिकेत स्लेजिंग तर होणारच!” ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे विधान
ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंतेत भर; जसप्रीत बुमराहच्या पावरफुल शॉटने ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त