दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत ४ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यातील पहिल्या डावात क्विंटन डी कॉकच्या एका कृत्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई संघ ८५ धावा १ बाद अशा स्थितीत असताना जिमी नीशमने टाकलेल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसने शॉट खेळला. परंतु तो शॉट सरळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या हार्दिक पंड्याच्या हातात गेला आणि त्याने तो चेंडू यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककडे वेगाने फेकला होता. यावेळी फाफ डू प्लेसिस दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी धावत होता. त्यामुळे डी कॉकनेही कसलाही विलंब न करता वेगाने यष्टी गुल केली होती. हे पाहून चेन्नईच्या समर्थकांचे हृदय तुटले होते.
परंतु रीप्लेमध्ये पाहता स्पष्ट दिसून आले होते की, फलंदाज क्रिजच्या बाहेरच होता. परंतु चेंडू हातात येण्यापूर्वीच डिकॉकच्या ग्लोजमुळे यष्टी गुल झाली होती. त्यामुळे तिसऱ्या अंपायरने त्याला नॉट आउट घोषित केले होते. डीकॉकचे हे कृत्य पाहून ट्विटरवर चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
https://twitter.com/lodulalit001/status/1388511073544728577?s=20
https://twitter.com/lodulalit001/status/1388511300590862339?s=20
एका युजरने लिहिले की, ‘विश्वातील सर्वात चिडक्या खेळाडूचा अवॉर्ड जातो क्विंटन डीकॉकला.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘क्विंटन डीकॉक जन्मापासूनच चिडका आहे.’
https://twitter.com/MOY707/status/1388510585973874690?s=20
Quinton de Kock doing wrong things at right time
Why ???? https://t.co/jPem2we8dx— Satya 🕊️⏩🔱 (@SOULO_satya) May 1, 2021
I'm supporting CSK…. but I don't think he did it intentionally…#MIvsCSK
— Vipul (@iamSRKfan91) May 1, 2021
यापूर्वी देखील पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत फखर जमान २०० धावांच्या अगदी जवळ असताना डीकॉकने त्याला चपळाईने बाद केले केले होते. परंतु क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर चीटिंग केल्याचे आरोप लावले होते.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चुकीचा ठरवत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून अंबाती रायुडू याने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली होती. तर फाफ डू प्लेसिसने ५० आणि मोईन अलीने ५८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर ४ बाद २१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून कायरन पोलार्डने अवघ्या ३४ चेंडूत ८७ धावांची खेळी करत ८७ धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने हा सामना ४ गडी राखून आपल्या नावावर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहच्या गोलंदाजीला लागला सुरुंग, सीएसकेविरुद्ध केली आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी
वन मॅन आर्मी! एकटा पॉलार्ड बलाढ्य सीएसकेला पडला भारी, ‘या’ विक्रमात रोहित-रैनालाही सोडले पिछाडीवर