दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (३१ ऑक्टोबर) आयपीएल २०२०ची रंगतदार लढत झाली. या लढतीत मुंबईने ९ विकेट्सने बाजी मारत दिल्लीला जोरदार झटका दिला. मात्र सामन्यादरम्यान मुंबईचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने असे काही केले की, त्याची तुलना चेन्नई सुपर किंग्सच्या एमएस धोनीशी होऊ लागली आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे सुरुवातीला दिल्ली संघाने फलंदाजी केली. मात्र पावरप्ले संपण्याच्या आतच दिल्लीचे सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आणि शिखन धवन बाद झाले. त्यानंतर संघाचा डाव सांभाळण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यर मैदानावर उतरला. त्याने १०व्या षटकापर्यंत रिषभ पंतसोबत मिळून ३५ धावांची भागिदारीही केली होती. मात्र पुढील ११वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मुंबईच्या फिरकीपटू राहुल चाहरने त्यांची भागिदारी मोडली.
चाहरच्या षटकातील दूसऱ्या चेंडूवर अय्यरने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याची बॅट चेंडूला लागली नाही. त्यामुळे यष्टीमागे उभा असलेल्या डी कॉकने तो चेंडू पकडला आणि अय्यरला यष्टीचीत केले. त्यानंतर सोशल मीडियावर डी कॉकच्या या चपळाईने केलेल्या यष्टीरक्षणाचे कौतुक होऊ लागले. काही चाहत्यांनी तर, डी कॉकच्या यष्टीरक्षणाची तुलना धोनीसोबत केली आहे.
Quinton de Kock does a Dhoni behind the stumps and sends the Delhi Capitals captain back to the pavilion!#DCvMI #DCvsMI #MIvsDC #MIvDC #IPL2020 #BestHomeCommentator
— Smriti Sinha (@smritisinha99) October 31, 2020
Ms Dhoni De Kock
🤝
Lightning quick stumpings
— Big Bren (@Bilkl_ricks_nai) October 31, 2020
#MIvsDC Quinton De Kock has effected two outstanding stumpings, one of Josh Phillippe and today of Shreyas Iyer. MS Dhoni esque, soft hands, quick reaction to break the stumps. Superb. Add his destructive batting. Best Wicketkeeper batsman going around across formats @mipaltan
— MOHD FUZAIL AHMAD (@mohdfuzailahmad) October 31, 2020
De Kock doing a Dhoni looking at his last 2 stumpings #MIvsDC
— Nirav Bhanushali (@NiravBhanushal9) October 31, 2020
In world cricket I think Quinton de kock is the new Dhoni with his stumping’s timing and speed #MIvsDC
— Nikhil k (@Nikhilk_2001) October 31, 2020
Did Dhoni transfer his stumping super power to Quinton de Kock? #DCvMI
— Sairaj Sundaram (@sairaj_sundaram) October 31, 2020
https://twitter.com/fabtober/status/1322490701985144832
दिल्लीचा पुढील प्रवास खडतर
मुंबई विरुद्धचा सामना मोठ्या फरकाने गमावल्यानंतर दिल्लीचा पुढील प्रवास खडतर झाला असल्याचे दिसत आहे. हा त्यांचा हंगामातील सलग चौथा पराभव होता. त्यामुळे १३ सामन्यांत १४ गुणांची कमाई करत दिल्ली संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. जर पुढील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धचा सामनाही त्यांनी गमावला. तर प्ले ऑफमध्ये त्यांना मिळणे अवघड होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
सनरायझर्स हैदराबादची ७व्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
‘अंपायरचा निर्णय चुकला,’ SRH Vs RCB सामन्यानंतर सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा काय आहे प्रकरण
‘…तरच तुझ्यासाठी उघडतील भारतीय संघाची दारे,’ माजी क्रिकेटरचा सूर्यकुमारला सल्ला
ट्रेंडिंग लेख-
राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला