भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये लवकरच कसोटी आणि वनडे मालिकेचा थरार सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. २६ डिसेंबरपासून या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज मिळालेल्या रिकाम्या वेळेचा आनंद घेतला दिसून येत आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
दक्षिण आफ्रिका संघातील यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे आनंदाची बातमी दिली होती. क्विंटन डी कॉक लवकरच बाबा होणार आहे. तत्पूर्वी तो आपल्या पत्नी सोबत काही खास क्षण घालवताना दिसून आला आहे.
क्विंटन डी कॉकची पत्नी साशा डी कॉकही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंटवर ६० हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. नुकताच तिने आपल्या अधिकृत सोशल सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती क्विंटन डी कॉक सोबत कृझवर बियरचा आनंद घेताना दिसून येत आहेत. या दोघांच्या आयुष्यात लवकरच तिसऱ्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे तिने कॅप्शन म्हणून लिहिले की, ” आम्ही ३ होण्यापूर्वी आयुष्यातील खास क्षण एकत्र घालवतोय..”
साशा डी कॉक आणि क्विंटन डी कॉक हे दोघेही २०१६ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. साशा डी कॉक ही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) स्पर्धेत चीयर लीडर होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झाले होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.
https://www.instagram.com/p/CXi5Z7INs9T/?utm_medium=copy_link
तसेच क्विंटन डी कॉक भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. हा सामना २६ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध नसणार आहे.
https://www.instagram.com/p/CRLeBNdMQrR/?utm_medium=copy_link
https://www.instagram.com/p/CV9xUsOtXW3/?utm_medium=copy_link
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)
वनडे मालिका
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)
महत्वाच्या बातम्या :
पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग २०२१ स्पर्धेत स्कायलार्कस, डॉल्फिन्स, टस्कर्स संघांचा सलग दुसरा विजय
ट्रोलर्सला मिळाले नवीन भांडवल! अजमल-मलिकच्या ‘तू पकड, मी पकड’ प्रसंगाची पुनरावृत्ती; पाहून व्हाल लोटपोट
सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात धडाडणार ‘स्टेनगन’, सांभाळणार मोठी जबाबदारी! पाहा संपूर्ण स्टाफ





