---Advertisement---

स्टंम्पच्या माईकमधून ‘विराट’ कानमंत्र, ज्यामुळे भारत मारतोय बाजी!

---Advertisement---

केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून सतत ‘नथिंग टू लूज’ म्हणजेच ‘गमावण्यासारखे काहीच नाही’ हे वाक्य ऐकायला मिळाले.

त्याचे हे वाक्य स्टंप माईकमधून ऐकू येत होते. यातून हे दिसून येते की विराट कर्णधाराला शोभेल असे प्रोत्साहन संघ सहकाऱ्यांना देत होता आणि आपण हा सामना जिंकू शकतो हा विश्वास त्यांना देत होता. दक्षिण आफ्रिकेची प्रत्येक विकेट गेल्यानंतर विराटच्या देहबोलीतून त्याची हा सामना जिंकण्यासाठीची जिद्द देखील दिसून येत होती.

https://twitter.com/AimlessAvian/status/950314032975593472

प्रत्येक विकेट घेतल्यावर विराट आक्रमक होत होता. यामुळे भारतीय गोलंदाज मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित झालेले पाहायला मिळाले.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांकडून चांगली कामगिरी झाली आहे. पहिल्या डावात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला २८६ धावात सर्वबाद केले आहे. दक्षिणआफ्रिका दुसऱ्या डावात सर्वबाद १३० केल्या. तत्पूर्वी भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद २०९ धावा केल्या होत्या.

आज सामन्याचा चौथा दिवस असून भारतासमोर आफ्रिकेने जिंकण्यासाठी २०८ धावांचे लक्ष ठेवले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment