चेन्नईच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आर अश्विनने गाजवला. १ बाद ५४ धावांपासून पुढे भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला होता. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी एका-नंतर-एक विकेट्स घेत भारतीय फलंदाजांना कोंडीत पकडले. परंतु अश्विनने एकाकी डाव संपेपर्यंत एकाकी झुंज देत शतक झळकावले. यासह एक खास कामगिरी त्याने केली आहे.
आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अश्विनने डावाखेर १४८ चेंडूंचा सामना करताना १०६ धावांची अफलातून खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १ षटकार आणि १४ चौकार मारले. अखेर इंग्लंडचा गोलंदाज ऑली स्टोनने त्याला त्रिफळाचित करत भारताचा दुसरा डाव गुंडाळला. यासह अश्विन चेन्नईच्या मैदानावर शतक झळकावणारा तमिळनाडूचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
अश्विनपुर्वी माजी भारतीय दिग्गज के श्रीकांत यांनी ही खास कामगिरी केली होती. १९८६-८७ मध्ये कट्टर विरोधक असणाऱ्या पाकिस्तान संघाविरुद्ध त्यांनी १२३ ही प्रशंसनीय धावसंख्या उभारली होती. यासह चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शतक करणारे ते पहिलेच तमिळ खेळाडू ठरला होते. त्यांच्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी अश्विनने हा पराक्रम केला आहे.
याबरोबरच वेस्ट इंडिजनंतर कोणत्या दुसऱ्या संघाविरुद्ध अश्विनचे हे पहिले शतक ठरले. यापुर्वी त्याने कसोटीत तब्बल ४ शतके केली आहे. ही चारही शतके त्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झळकावली होती. २०११ मध्ये पहिल्यांदा त्याने १०३ धावा करत शतकाची नोंद केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये १२४ धावा आणि २०१६ मध्ये ११३ व ११८ धावांची प्रशंसनीय कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
सिराजचा हैदराबादी दणका! ठोकले दोन खणखणीत षटकार, ड्रेसिंग रूममध्ये पठ्ठ्याचं जंगी स्वागत
कहर! चेन्नई कसोटीत अश्विनचे शतक अन् सोबतच बळींचा पंचक, याआधी ‘इतक्यांदा’ केलंय असं
चेन्नई कसोटीत विराटचे झुंजार अर्धशतक, गांगुलीला पछाडत ‘या’ स्थानी झेप